Airtel-Jio esakal
विज्ञान-तंत्र

Airtel, Jio ची ग्राहकांसाठी खास 'ऑफर'

बाळकृष्ण मधाळे

एअरटेल, जिओ (Airtel, Jio) या दोन कंपन्यांनी आता 30 व 60 दिवसांच्या वैधतेसह आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड प्लॅन्स आणले आहेत. त्यांची किंमत देखील जास्त नाही. या प्लॅन्समध्ये अमर्यादित कॉल, एसएमएस आणि स्ट्रीमिंगच्या फायदे डेटासह दिले जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही योजनांबद्दल सांगत आहोत.

एअरटेल, जिओ (Airtel, Jio) या दोन कंपन्यांनी आता 30 व 60 दिवसांच्या वैधतेसह आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड प्लॅन्स आणले आहेत.

Airtel चा 456 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

एअरटेलच्या 456 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉल आणि 60 दिवसांची वैधता दिली जाते. या प्लॅनमध्ये, दररोज ग्राहकांना 100 एसएमएस देखील मिळतात. शिवाय, दररोज 50 GB डेटाही मिळणार आहे. त्याचबरोबर या योजनेसह ग्राहकांना प्राइम व्हिडिओ मोबाईल एडिशन, एअरटेल एक्सस्ट्रीम आणि विंक म्युझिकचं सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे. यामध्ये आपल्याला FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅकही मिळणार आहे.

Airtel चा 299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

एअरटेलच्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज अमर्यादित कॉल, 30 दिवसांची वैधता आणि 100 SMS मिळणार आहेत. शिवाय, दररोज 30 GB डेटाही दिला जाणार आहे. 30 GB डेटा मर्यादेनंतर वापरकर्त्यांना 50p/MB शुल्क आकारले जाणार आहे.

Jio चा 127 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Jio चा 'नो डेली डेटा लिमिट प्लॅन' 127 रुपयांपासून सुरू होतो. हा पॅक कोणत्याही मर्यादेशिवाय 12 GB हाय-स्पीडसह 4G डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये डेटा व्यतिरिक्त अमर्यादित कॉल, 100 एसएमएस देखील दिले जातात. या योजनेसह जिओ अॅप्सची सदस्यता देखील विनामूल्य उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता 15 दिवसांची आहे.

127 रुपयांच्या प्लॅन व्यतिरिक्त, तुम्हाला 247 रुपयांचा प्रीपेड प्लॅनही मिळतो. या प्लॅनची वैधता 30 दिवसांची असून यात 25 GB हाय-स्पीडसह 4G डेटा देण्यात आला आहे. हा डेटा कोणत्याही दैनंदिन मर्यादेशिवाय जास्त आहे.

जिओच्या 447 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता 60 दिवसांची असून यामध्ये युजर्सना 50 GB हाय-स्पीडसह 4G डेटा दिला जातो.

Jio चा 597 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओच्या 597 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता 90 दिवसांची असून यामध्ये 75 GB हाय-स्पीड डेटा आपल्याला मिळतो. तर उर्वरित फायदे वरील नमूद केलेल्या योजनेप्रमाणेच आहेत. जिओचा 2,397 रुपयांचा प्रीपेड प्लॅन हा शेवटचा प्लॅन असून यात आपल्याला दररोज लिमिटनुसार डेटा मिळणार आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची असून हा प्लॅन आपल्याला 365 GB हायस्पीड डेटा देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT