PUBG मोबाईलने सुमारे पाच दिवसात 16 लाखांपेक्षा जास्त अकाउंट्सवर कायमची बंदी घातली आहे. डेव्हलपर्सनी ही माहिती ट्विटरद्वारे शेअर केली. 
विज्ञान-तंत्र

बापरे! PUBG मोबाईलचा तब्बल 16 लाखांपेक्षा जास्त यूजर्सना झटका; एका क्षणात Accounts केले बॅन

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : PUBG मोबाईलने काही दिवसांआधीच लहान कपॅसिटीच्या मोबाईलसाठी असलेली आपली अप्लिकेशन आणि वेबसाईट बंद केली होती. यानंतर आता PUBG मोबाईलने अजून एक जोरदार झटका आपल्या तब्बल 16 लाखांपेक्षा जास्त यूजर्सना दिला आहे. 

PUBG मोबाईलने सुमारे पाच दिवसात 16 लाखांपेक्षा जास्त अकाउंट्सवर कायमची बंदी घातली आहे. डेव्हलपर्सनी ही माहिती ट्विटरद्वारे शेअर केली. पब्जी मोबाइलच्या ताज्या बाईन पॅन अँटी-चीट अहवालात वेगवेगळ्या स्तरावरील खेळाडूंची आकडेवारी दर्शविली गेली, त्यातील बहुतेक खेळाडू  ब्रॉन्झ लेव्हलला होते. या बंदीमागील अनेक कारणांपैकी फसवणूक, हॅकिंग इत्यादींचा समावेश आहे. 

गेममध्ये फसवणूक करून आणि हॅकिंग करून इतर खेळाडूंवर विजय मिळवणाऱ्या लाखो खेळाडूंच्या खात्यावर पब्जी मोबाइलने बंदी घातली आहे. डेव्हलपर्सनी ट्विट केले आहे की पाच दिवसांत 16 लाखांपेक्षा जास्त अधिक खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे. या सर्वांवर फसवणूक आणि हॅकिंगचा आरोप आहे. या खेळाडूंच्या खात्यावर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. PUBG मोबाइल अँटी चीट अहवालानुसार 28 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान एकूण 1,691,949 खात्यांवर कायमची बंदी घातली आहे.

ट्वीटमध्ये PUBG मोबाइलने असेही शेअर केले आहे की या  16 लाखाहून अधिक खात्यांमध्ये 35 टक्के खेळाडू ब्रॉन्झ लेव्हलवर डायमंड लेव्हलवर 13 टक्के, क्राउनमध्ये 12 टक्के, सिल्वर आणि प्लॅटिनम लेव्हलवर अनुक्रमे 11 टक्के आणि 9 टक्के  तर गोल्ड लेव्हलवर 8 टक्के खेळाडू होते. निपुण आणि उर्वरित 1 टक्के कॉन्करर लेव्हलवर होते.

खेळाडूंकडून हॅक वापरल्या जात असल्याची माहिती देत ​​पीयूबीजी मोबाइलने दिली. बंदी घातलेल्या खात्यांपैकी 34 टक्के ऑटो-एम आणि एक्स-रे व्हिजन हॅक वापरत आहेत, ज्यामुळे खेळाडूंना शत्रूंवर एम लॉक करण्याची परवानगी मिळाली आणि भिंतींवरुन पाहण्यास मदत झाली. या खात्यांमध्ये स्पीड हॅक्ससाठी १२ टक्के, मॉडिफिकेशन ऑफ एरिया डैमेजसाठी 6 टक्के, पर्सनॅलिटी मॉडिफाय करण्यासाठी 10 टक्के आणि काही इतर हॅक्स वापरण्यासाठी 10  टक्के बंदी घातली आहे.

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT