AI Air Hostess eSakal
विज्ञान-तंत्र

AI Air Hostess : कतार एअरवेजने सादर केली चक्क एआय-एअर होस्टेस; प्रवाशांच्या प्रश्नांची देते अचूक उत्तरं.. पाहा व्हिडिओ

Qatar Airways : विमानातील प्रवाशांना प्रवासाचा अधिक चांगला अनुभव यावा यासाठी कतार एअरवेज आता एआयचा वापर करत आहे.

Sudesh

Qatar Airways AI Air Hostess : आजकाल सर्व क्षेत्रांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर होतो आहे. काही दिवसांपूर्वी एका शाळेमध्ये एआय शिक्षिका पहायला मिळाली होती. यातच आता कतार एअरवेजने चक्क एआय एअर होस्टेस सादर केली आहे. Sama 2.0 असं या एआय क्रूचं नाव आहे.

या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बेस्ड एअर होस्टेसचा डेमो कतार एअरवेजने (Qatar Airways) वेब समिट कतार या कार्यक्रमात दिला होता. त्यानंतर आता IBT बर्लिन 2024 याठिकाणी ही एअर होस्टेस सादर केली आहे. अर्थात, हे एआय खऱ्या एअर होस्टेसची जागा घेणार नसल्याचं कतार सरकारने स्पष्ट केलं आहे. हे केवळ एक एक्स्ट्रा फीचर म्हणून असेल. (Artificial Intelligence)

विमानातील प्रवाशांना प्रवासाचा अधिक चांगला अनुभव यावा यासाठी कतार एअरवेज आता एआयचा वापर करत आहे. यामुळे जगातील इतर एअरलाईन्स देखील अशा प्रकारचे फीचर्स लाँच करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Ai-powered Air Hostess)

मिळाली खास ट्रेनिंग

Sama 2.0 या एआय एअर होस्टेसला Qatar Airways ने फ्लाइट अटेंडेंट म्हणून खास ट्रेनिंग दिली आहे. एवढंच नाही, तर मीडिया आणि प्रवाशांशी संवाद साधून देखील ही एआय आणखी गोष्टी शिकते आणि स्वतःमध्ये सुधारणा करते. या एआयचं अपडेटेड व्हर्जन हे प्रवाशांच्या प्रश्नांना रिअल-टाईम उत्तरं देऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT