QR Code esakal
विज्ञान-तंत्र

QR Code : कॅशलेस व्यवहारांसाठी क्यूआर कोडची चलती, ग्रामीण भागातही ऑनलाईन व्यवहारांत वाढ

QR Code : वाढत्या आधुनिकीकरणाने शहरी भागासह ग्रामीण भागातही अनेक हायटेक बदल व्हायला सुरुवात झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

QR Code : वाढत्या आधुनिकीकरणाने शहरी भागासह ग्रामीण भागातही अनेक हायटेक बदल व्हायला सुरुवात झाली आहे. यात शासकीय योजनांचा लाभ असो वा शालेय शिक्षण, आरोग्य व्यवस्था अगर बाजारातील जीवनावश्यक वस्तूंची खरेदी. आता सगळीकडेच कॅशलेस व्यवहारांना अधिक पसंती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही ऑनलाईन क्यूआर कोडची चलती आहे.

बाजारात इलेक्ट्रॉनिक साधने उपलब्ध तर झालीच, शिवाय मोबाईल इंटरनेटचा डेटाही उपलब्ध असतो. शिवाय इंटरनेटचा वेगही अधिक असल्याने शहरी भागातील डिजिटल रुपया ग्रामीण भागातही चांगला स्थिरावला आहे. अगदी दूधवाला, भाजीवाल्याकडेही क्यूआर कोड उपलब्ध आहे. गेल्या दोन वर्षांत ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

पूर्वीच्या तुलनेत सध्या ऑनलाईन व्यवहारांवर सर्वाधिक भर दिला जात आहे. त्यामुळे रोखीने व्यवहार कमी झाले आहेत. संसारोपयोगी साहित्यापासून अगदी दहा-वीस रुपयांना मिळणारी वस्तू, खाद्यपदार्थ घ्यायचे असतील तरी क्यूआर कोड स्कॅन केला जात आहे. रोखीने होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण ४० टक्के असून, आता खिशात नव्हे तर बँक खात्यात पैसा असायला हवा अशी व्यवस्था निर्माण झाली आहे.

बदलत्या काळानुसार बँकिंग व्यवसाय आधुनिक झाला, त्याचबरोबर त्यातील ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढू लागले. सर्वच व्यवहार मोबाईलद्वारे किंवा अन्य डिजिटल माध्यमातून करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. म्हणजेच बँक खाते क्रमांक पळवण्यापासून पिन पासवर्ड चोरण्यापर्यंत आणि ग्राहकाला फसवून बँक खात्याची माहिती घेण्यापर्यंत ऑनलाईन चोरट्यांची मजल गेली आहे. अशा पद्धतीने आपण लुबाडले जाऊ नये याची दक्षता सर्वांनीच घेणे गरजेचे आहे.

सध्याचे डिजिटल युग आहे. त्यामुळे ग्राहक क्यूआर कोडची मागणी करतात. छोट्या-छोट्या गोष्टीसाठी ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करायचे असते. त्यामुळे लहान-मोठ्या सर्वच व्यावसायिकांनी तशी सोय उपलब्ध केली आहे.

हिंदूराव फराकटे, फळ व्यावसायिक, बिद्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळेतली पोरं...! डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानात शाहीन आफ्रिदीची उडवली खिल्ली; PSL च्या पत्रकार परिषदेत केला ना कल्ला... Video Viral

Hindu Muslim Unity : दुकानाला भीषण आग अन् आत शंकराची मूर्ती, धर्माच्या सीमा ओलांडून मुस्लिम तरुणांनी केलं धाडस, राज्यभरातून होतेय कौतुक

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत दुचाकी फक्त दोनशे, तर चार चाकी वाहनामध्ये दोन हजार रुपयांचे इंधन भरता येणार

Pune–Mumbai Expressway Traffic : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर निघालात? आधी हे वाचा, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

Kolhapur Fuel Limit : दुचाकीत 200 तर, चारचाकीत 2000 पर्यंतच मिळणार पेट्रोल; साठे बाजार करणाऱ्यांवर होणार कारवाई, बाटली-कॅनमधून दिल्यास दंड!

SCROLL FOR NEXT