Rakesh Sharma Sare Jahan Se Accha Reply Indira Gandhi Coversation esakal
विज्ञान-तंत्र

Rakesh Sharma India : इंदिरा गांधींनी विचारलं, अंतराळातून भारत कसा दिसतो? अंतराळवीराच्या उत्तराने जिंकलेली लाखो मने, व्हिडिओ बघाच

Rakesh Sharma Sare Jahan Se Accha Reply Indira Gandhi Coversation : राकेश शर्मा यांना १९८४ मध्ये इंदिरा गांधींनी विचारलं होत की अंतराळातून भारत कसा दिसतो? त्यावर त्यांनी जे उत्तर दिले होते त्यांची ही क्लिप खूप व्हायरल होत आहे.

Saisimran Ghashi

Rakesh Sharma Indira Gandhi Coversation : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स तब्बल 9 महिने अवकाशात राहून पृथ्वीवर परतल्या आहेत. त्यानंतर त्यांची पहिलीच पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये एका पत्रकाराने त्यांना प्रश्न केला अवकाशातून भारत कसा दिसतो. त्यावर त्यांनी 'अद्भुत' असे उत्तर दिले. पण तुम्हाला माहिती आहे का, ३ एप्रिल १९८४ रोजी राकेश शर्मा, भारतीय हवाई दलाचे पायलट, अंतराळात जाऊन भारताच्या इतिहासात अनोखा ठसा उमटवला होता. त्यांच्या एका उत्तराने भारतीयांची माने जिंकली होती.

अंतराळ मिशन दरम्यान, राकेश शर्मा वैज्ञानिक प्रयोग आणि निरीक्षणे करत होते, परंतु त्याच्या संवादाचे सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते इंदिरा गांधींनी विचारलेले एक प्रश्न. त्यांनी राकेश शर्मा यांना विचारले, "अंतराळातून भारत कसा दिसतो?" राकेश शर्मा यांनी त्वरित आणि अभिमानाने उत्तर दिले, "मैं बिना किसी हिचकिचाहट के कह सकता हूँ, 'सारे जहाँ से अच्छा'." त्यांचे हे शब्द केवळ त्याच्या साहसी प्रयत्नांचे प्रतीक नाही तर ते भारतीय राष्ट्राच्या सन्मानाचे आणि अभिमानाचे प्रतीक बनले.

त्यांच्या या संवादात इंदिरा गांधींनी त्यांना विचारले की, "चंद्रावर पोहोचल्यावर तुम्हाला कसा वाटल?" यावर राकेश शर्मा यांनी हलक्या फुलक्या अंदाजात उत्तर दिलं की, "माझं आरोग्य खूप चांगलं आहे आणि मी आवश्यकतेपेक्षा जास्त खात आहे!" पुढे राकेश शर्मा यांनी सांगितले की, त्यांना चंद्रावर आगमन करताच अनेक चांगल्या पदार्थांनी स्वागत केले, जे टेबलवर व्यवस्थित ठेवले होते आणि त्यावर प्लॅस्टिक फुलांची सजावट केली होती.

इंदिरा गांधींनी राकेश शर्मा यांचे अभिनंदन करताना म्हटले की, त्यांचा ऐतिहासिक प्रवास देशातील तरुण पिढीसाठी प्रेरणादायक ठरेल. तसेच, यामुळे देशातील अंतराळ अन्वेषणाबाबत जागरूकता देखील वाढेल, असे त्यांनी सांगितले. राकेश शर्मा यांनी त्या संवादाच्या शेवटी इंदिरा गांधींना धन्यवाद दिले आणि सांगितले की, पृथ्वीवर घेतलेल्या प्रशिक्षणामुळे त्यांना अंतराळ मिशन दरम्यान खूप मदत झाली.

या ऐतिहासिक घटनेची आठवण करताना आजही राकेश शर्मा यांच्या 'सारे जहाँ से अच्छा' या वाक्याचा गजर भारताच्या अंतराळ मोहिमेतील यशाचा प्रतीक बनला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हम दो, हमारे दो'पडलं मागे, भारतात लोकसंख्या वाढीला ब्रेक; कारण काय? अनेक देशात एका अपत्याचा जन्मही कठीण

Pimpri Traffic : रस्त्यावरील पांढरे पट्टे ‘गायब’, शहर-उपनगरांत पादचारी, वाहनचालक त्रस्त; अपघाताचा धोका

Solapur News: ‘आरसीसीबी’मुळे शॉक लागूनही होत नाही मृत्यू; महावितरणचे ग्राहकांना आवाहन, तीन घटनांमध्ये सहा जणांनी गमावला जीव

Temporary Bridge: तात्पुरत्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात; धराली येथे नागरिकांशी होणार संपर्क, मदत साहित्याच्या वाटपासाठीही फायदा

Angarki Chaturthi 2025 Marathi Wishes: अंगारकी चतुर्थीनिमित्त नातेवाईक अन् गणेशभक्तांना पाठवा भक्तीमय शुभेच्छा, वाचा सुंदर मॅसेज

SCROLL FOR NEXT