Ratan Tata and Bill Ford esakal
विज्ञान-तंत्र

Ratan Tata Ford : तुम्हाला माहितीये काय रतन टाटा अन् फोर्डच्या अनोख्या बदल्याची कहाणी? जॅग्वार-लँड रोव्हर विकत घेत रचला होता इतिहास

Ratan Tata and Bill Ford : 2008 साली टाटा मोटर्सने फोर्डकडून जगप्रसिद्ध ब्रँड्स ‘जॅग्वार’ आणि ‘लँड रोव्हर’ खरेदी करून मोठा व्यवहार केला.

Saisimran Ghashi

Ratan Tata : रतन टाटा आणि बिल फोर्ड यांच्यातील संघर्षाची कथा आजही उद्योगजगतात प्रेरणादायी मानली जाते. 2008 साली टाटा मोटर्सने फोर्डकडून जगप्रसिद्ध ब्रँड्स ‘जॅग्वार’ आणि ‘लँड रोव्हर’ खरेदी करून मोठा व्यवहार केला. हा फक्त व्यावसायिक विजय नव्हता तर रतन टाटा यांच्यासाठी वैयक्तिक विजय होता. या यशस्वी ‘बदल्या’ची कहाणी वेदांत बिरला यांनी ट्विटच्या माध्यमातून शेअर केली.

1998 मध्ये रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा मोटर्सने भारताची पहिली स्वदेशी कार ‘इंडिका’ लाँच केली होती. मात्र, अपेक्षेप्रमाणे विक्री झाली नाही आणि कंपनीला आपला कार व्यवसाय विकावा लागेल, अशी स्थिती निर्माण झाली. त्यानंतर 1999 मध्ये रतन टाटा आणि त्यांच्या टीमने अमेरिकन वाहन कंपनी फोर्डसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला.

फोर्डच्या चेअरमन बिल फोर्ड यांनी या बैठकीत टाटांचा अपमान करत खिल्ली उडवली होती आणि त्यांना कार व्यवसायात न उतरण्याचा सल्लाही दिला होता, असं म्हटलं जातं.बिल फोर्ड यांनी असा दावा केला की, फोर्ड टाटा मोटर्सवर उपकार करणार आहे, जर त्यांनी हा व्यवसाय विकत घेतला. या अपमानास्पद अनुभवाने रतन टाटा अधिक दृढनिश्चयी झाले आणि त्यांनी आपला कार व्यवसाय विकण्याचा निर्णय बदलला.

पुढे 2008 मध्ये रतन टाटा यांनी फोर्डकडून जॅग्वार आणि लँड रोव्हर विकत घेऊन एक ऐतिहासिक सौदा केला, ज्याने टाटा मोटर्सला जागतिक स्तरावर एका प्रमुख वाहन निर्मात्याच्या रूपात ओळख मिळवून दिली. आज, टाटा मोटर्स ही जगभरात 104 पेक्षा जास्त उपकंपन्यांसह आघाडीची वाहन निर्माती कंपनी आहे, ज्यात जगप्रसिद्ध जॅग्वार लँड रोव्हर आणि टाटा दाएवो यांचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Nanded Dasara: नांदेडमध्ये दसरा महोत्सव उत्साहात; हल्ला-महल्ला मिरवणुकीत हजारो शीख भाविकांचा सहभाग

Pune Crime : टीव्ही बंद करायला सांगितला म्हणून केली वडिलांची हत्या; ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या घटनेने कोथरुड मध्ये खळबळ

Teacher Recruitment: मराठवाड्यात शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! ४५७ समन्वयक पदांसाठी ऑनलाइन परीक्षा १ ते ५ डिसेंबर

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; आता E-kyc केलेल्या बहिणींनाच मिळणार लाभ, दिवाळीतील हप्ता पडणार लांबणीवर

SCROLL FOR NEXT