Realme 15 smartphone and Buds T200 Price Features esakal
विज्ञान-तंत्र

लॉन्च झाला Realme 15 अन् सोबत मिळणार Buds T200; मोबाईलमध्ये आहेत दमदार फीचर्स, किंमत फक्त..

Realme 15 smartphone and Buds T200 Price Features : रिअलमीने भारतात Realme 15 आणि Buds T200 दमदार फीचर्ससह लॉन्च केले आहेत. या डिव्हाईसेससाठी आकर्षक ऑफर्स आणि रंग उपलब्ध आहेत.

Saisimran Ghashi

  • रिअलमी 15 हा स्मार्टफोन प्रगत AI कॅमेरा आणि 7000mAh बॅटरीसह सादर झाला आहे.

  • बड्स T200 मध्ये बास बूस्ट आणि नॉईज कॅन्सलेशनसह आधुनिक डिझाइन आहे.

  • खरेदीसाठी 5000 पर्यंतचे ऑफर आणि विविध रंगांमध्ये डिव्हाईसेस उपलब्ध आहेत

Realme 15 Price : नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करताय? मग Realme चं नव लॉन्च तुमच्यासाठीच आहे. रिअलमीने भारतात आपले नवे Realme 15 आणि Realme Buds T200 लॉन्च केले आहेत. अत्याधुनिक फीचर्स, प्रगत AI तंत्रज्ञान आणि जबरदस्त बॅटरी बॅकअपसह येणारा हा स्मार्टफोन आपल्या किंमतीतही एक उत्तम पर्याय ठरत आहे. त्याचबरोबर नवीन इयरबड्सही दमदार आवाज आणि आकर्षक रंगसंगतीत सादर करण्यात आले आहेत.

Realme 15

विक्री सुरू- 30 जुलैपासून | किंमत- 23,999 रुपयेपासून

Realme 15 तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे

  • 8GB + 128GB – 23,999 रुपये

  • 8GB + 256GB – 25,999 रुपये

  • 12GB + 256GB – 28,999 रुपये

रंग-

फ्लोइंग सिल्व्हर, वेल्वेट ग्रीन आणि सिल्क पिंक

खरेदीदारांना मिळणार आहेत खास ऑफर्स

  • 1500 ची बँक सूट

  • 5000 पर्यंतचा एक्सचेंज बोनस

मुख्य फीचर्स

  • प्रोसेसर: MediaTek Dimensity 7300+ 5G – उत्तम गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी

  • डिस्प्ले: 6.8 इंच 4D कर्व्ह्ड AMOLED स्क्रीन, 144Hz रिफ्रेश रेट, 6,500 निट्स ब्राइटनेस

  • बॅटरी: 7000mAh क्षमतेची मोठी बॅटरी आणि 80W सुपरफास्ट चार्जिंग

  • कॅमेरा

    • मागील कॅमेरा – 50MP Sony IMX882 AI कॅमेरा + 8MP वाइड अँगल

    • सेल्फी कॅमेरा – 50MP AI फ्रंट कॅमेरा

  • सॉफ्टवेअर: Android 15 आधारित Realme UI 6.0

  • AI फीचर्स

    • AI Edit Genie – आवाजावर आधारित फोटो एडिटिंग

    • AI Party – लाईव्ह कॅमेरा सेटिंग्ज अ‍ॅडजस्ट करतो

  • कनेक्टिव्हिटी: Dual 5G, Bluetooth 5.4, Wi-Fi 6

  • डस्ट आणि वॉटर रेसिस्टंस: IP66, IP68 आणि IP69 रेटिंग्स

Realme Buds T200

विक्री सुरू- 1 ऑगस्टपासून | किंमत 1999 रुपये (200 ची सवलत)

रंग-

मिस्टिक ग्रे, स्नोई व्हाईट, ड्रीमी पर्पल आणि नियॉन ग्रीन

फीचर्स

  • 12.4mm डायनॅमिक बास ड्रायव्हर

  • 32dB ANC (Active Noise Cancellation) – बाहेरील आवाज रोखण्यासाठी

  • आरामदायक डिझाइन आणि स्टायलिश लूक

Flipkart, Realme च्या वेबसाइटवर आणि ऑफलाइन स्टोअर्सवर दोन्ही प्रॉडक्ट्स खरेदीसाठी उपलब्ध असतील. तुमचा पुढचा स्मार्टफोन किंवा इयरबड्स शोध संपवण्यासाठी रिअलमीची ही नवी मालिका एक उत्तम पर्याय ठरू शकते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

Latest Maharashtra News Updates: उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात सकाळी 7 वाजल्यापासून 35000 विसर्ग

Pune Traffic : गणेशोत्सवाच्या तयारीसोबत खरेदीची गर्दी; पुण्याच्या मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT