Realme world s fastest charge 125w phone realme gt 2 pro launch 28 February check details  
विज्ञान-तंत्र

Realme घेऊन येतेय जगातील सर्वात फास्ट चार्जिंग फोन, वाचा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने घोषणा केली आहे की कंपनी जगातील सर्वात वेगवान स्मार्टफोन चार्जिंग टेक्नोलॉजी घेऊन येत आहे. जी मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2022 मध्ये सादर केले जाईल. Realme चा नवीन फास्ट चार्जिंग स्मार्टफोन हा 125W सपोर्टसह येईल. तसेच MWC 2022 मध्ये, कंपनी Snapdragon 8 Gen 1 चिपसेट सादर करू शकते. याशिवाय कंपनीने Realme GT 2 Pro स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

14 मिनिटांपेक्षा कमी वेळेत होईल चार्ज

Realme ने दावा केला की, ही पहिली आहे ज्यांनी 125W फ्लॅश चार्जिंग टेक्नोलॉजी पहिल्यांदा लॉन्च केली आहे. यापूर्वी 120W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी कंपनीने सादर केली होती, त्यानुसारर Xiaomi ने 120W हायपर चार्जिंग फास्ट टेक्नॉलॉजी सादर केली होती. Xiaomi ने दावा केला आहे की, या तंत्रज्ञानाने स्मार्टफोन फक्त 14 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकतो. त्याचप्रमाणे विवो कंपनीनेही फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान सादर केले आहे. अशा परिस्थितीत realme चा दावा येत्या काही दिवसांत खरा ठरू शकेल का ते पाहाता येणार आहे. जर असे झाले तर 14 मिनिटांपेक्षा कमी वेळात Realme स्मार्टफोन चार्ज होऊ शकतो. realme च्या अशा तंत्रज्ञानामुळे मोबाईल फोन चार्जिंगच्या जगात नवीन क्रांती होऊ शकते.

R&D वर होणार मोठी गुंतवणूक

कंपनी तिच्या गो प्रीमियम स्टॅटर्जी अंतर्गत संशोधन आणि विकास (R&D) संसाधनांवर 70 टक्के गुंतवणूक करेल. कंपनीचा असा विश्वास आहे की, सध्याच्या काळात फास्ट चार्जिंग हे एक महत्त्वाचे फीचर म्हणून उदयास आले आहे. कंपनीला विश्वास आहे की, नवीन चार्जिंग तंत्रज्ञान वापरकर्त्यांना अगदी कमी वेळेत स्मार्टफोन चार्जिंग करता येईल. Realme ने या आठवड्यात भारतात स्मार्टफोनच्या Narzo सीरीज लॉन्च करण्याची घोषणा केली. जी येत्या 24 फेब्रुवारीला भारतात लॉन्च होणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

SWAYAM Exam 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SWAYAM जानेवारी 2026 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या परीक्षा कधी होणार

Gold Rate Today : सोनं-चांदी सुसाट! जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे MCX बाजारात सोनं २ हजारांनी महागलं; मकर संक्रांतीला भाव कमी होणार?

ट्रम्प व्हेनेझुएलाचे काळजीवाहू राष्ट्रपती, स्वत:च शेअर केला फोटो; काय म्हणाले?

IND vs NZ 1st ODI : भारताला मोठा धक्का! रिषभ पंतनंतर आणखीन एका सुपरस्टारची मालिकेतून माघार; वर्ल्ड कपपूर्वी वाढली चिंता

SCROLL FOR NEXT