Smartphone
Smartphone Sakal
विज्ञान-तंत्र

Redmi vs Lava: ७ हजारांच्या बजेटमधील कोणता स्मार्टफोन आहे बेस्ट? जाणून घ्या फीचर्स-किंमत

सकाळ डिजिटल टीम

Best Smartphones Under 7000: भारतीय बाजारात कमी किंमतीत येणारे एकापेक्षा एक शानदार स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. तुम्ही जर ७ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणारा फोन शोधत असाल तर Redmi A1 आणि Lava X2 स्मार्टफोन्स चांगला पर्याय आहे. हे दोन्ही फोन्स शानदार फीचर्ससह येतात. कमी किंमतीत येणाऱ्या या फोन्सच्या फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Redmi A1 ची किंमत

रेडमीच्या या फोनची किंमत ६,४९९ रुपये आहे. फोनला HSBC कॅशबॅक क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास २५० रुपये डिस्काउंटचा फायदा मिळेल. तुम्ही Amazon Pay ICICI क्रेडिट कार्ड वापरून फोनला २७४ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता.

Redmi A1 चे फीचर्स

रेडमीच्या या फोनमध्ये ६.५२ इंच एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मीडियाटेक हीलियो ए२२ प्रोसेसरसह येतो. यात फोटोग्राफीसाठी ८ मेगापिक्सल ड्यूल रियर कॅमेरा आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. फोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज दिले आहे. तर पॉवर बॅकअपसाठी १० वॉट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल.

हेही वाचा: Redmi Phone: 'या' फोनला खरेदीसाठी ग्राहकांची लागली रांग, अवघ्या ५ मिनिटात ३ लाख यूनिट्सची विक्री

Lava X2

Lava X2 च्या फोनची किंमत ६,९९९ रुपये आहे. फोनला अ‍ॅमेझॉन पे ICICI क्रेडिट कार्डचा वापर करून २९६ रुपये ईएमआयसह खरेदी करू शकता. तसेच, HSBC बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास २५० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल.

Lava X2 चे फीचर्स

Lava X2 मध्ये मीडियाटेक हीलियो ए२५ प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. फोन ६.५ इंच एचडी प्लस आयपीएस डिस्प्लेसह येतो. यामध्ये फोटोग्राफीसाठी ८ मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT