Redmi Note 11 SE esakal
विज्ञान-तंत्र

Redmi Note 11 SE लवकरच भारतात होणार लॉन्च

नवीन Redmi फोन 'Redmi Note 10S'च अपडेटेड व्हर्जन

सकाळ डिजिटल टीम

Redmi Note 11 Series स्मार्टफोन भारतात खूप लोकप्रिय झाले आहेत. Redmi कडे सध्या भारतात Redmi Note 11 Pro 5G आणि Redmi Note 11T 5G सारखे स्मार्टफोन आहेत. Redmi भारतात आपल्या Note 11 सिरिजमधील आणखी एक नवीन फोन लॉन्च करणार आहे. एका टिपस्टरनुसार, नवीन Redmi फोन 'Redmi Note 10S'च अपडेटेड व्हर्जन असेल आणि त्याचे नाव Redmi Note 11 SE असेल.

टिपस्टर Kacper Skrzypek ने MIUI कोडमध्ये Redmi Note 11 SE पाहिला. टिपस्टरचा दावा आहे की, भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले जाणारे डिव्हाइस चीनमध्ये लॉन्च केलेल्या डिव्हाइसपेक्षा वेगळे असेल. MIUI कोडने उघड केले आहे की, आगामी Redmi 11 SE ही Redmi Note 10S ची रिब्रँडेड आवृत्ती असेल जी गेल्या वर्षी चीनमध्ये लॉन्च झाली होती.

'Redmi Note 11 SE'चे स्पेसिफिकेशन

असा दावा केला जात आहे की हेच उपकरण इतर काही बाजारांमध्ये Poco M5s म्हणून लॉन्च केले जाईल. हा हँडसेट आधीच अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर पाहिला गेला आहे.

जर लीकवर विश्वास ठेवायचा असेल, तर Note 11 SE ला Redmi Note 10S प्रमाणेच स्पेसिफिकेशन्स दिले जातील. फोनमध्ये 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे जो फुल एचडी रिझोल्यूशन देतो. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 60 Hz आहे. फोनमध्ये MediaTek Helio G95 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. याशिवाय 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज दिले जाण्याची शक्यता आहे.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर Redmi Note 11 SE मध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 64 मेगापिक्सल प्राइमरी, 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड, 2 मेगापिक्सल डेप्थ आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर असेल. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी, 5000mAh बॅटरी दिली जाईल जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सॉफ्टवेअरबद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 12 आधारित MIUI 13 सह येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

SCROLL FOR NEXT