Redmi Note 13 256GB mobile phone flipkart discount offer esakal
विज्ञान-तंत्र

Redmi Note 13 : खुशखबर! रेडमीच्या जबरदस्त फीचर्सवाल्या 5G मोबाईलवर मिळतोय 7 हजारांचा डिस्काउंट, कुठे खरेदी कराल? पाहा एका क्लिकवर

Redmi Note 13 256GB मॉडेलवर 7000 रुपयांचा मोठा डिस्काउंटसह उपलब्ध आहे. Xiaomi च्या Redmi Note 13 मध्ये उत्कृष्ट कॅमेरा आणि 5G क्षमता आहेत.

Saisimran Ghashi

Flipkart Smartphone Discount Offer : भारतीय स्मार्टफोन बाजारात बजेट आणि मिडरेंज सेगमेंटमध्ये दबदबा असलेल्या Xiaomi च्या Redmi ब्रँडने नवीन वर्षाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. Redmi Note 13 5G च्या 256GB व्हेरिएंटवर फ्लिपकार्टवर मोठी सूट मिळत आहे. यामुळे हा स्टायलिश आणि अत्याधुनिक फिचर्सने भरलेला स्मार्टफोन खरेदी करण्याची उत्तम संधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे.

फ्लिपकार्टचा न्यू ईयर गिफ्ट

फ्लिपकार्टने Redmi Note 13 5G च्या 256GB मॉडेलची किंमत तब्बल 28% नी कमी केली आहे. या मॉडेलची मूळ किंमत ₹24,999 होती, पण आता हा फोन केवळ ₹17,973 मध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास अतिरिक्त 5% कॅशबॅकही मिळणार आहे.

Redmi Note 13 5G आकर्षक डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्स

Graphite Black, Arctic White, Ocean Teal आणि Prism Gold अशा चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असलेला Redmi Note 13 5G ग्राहकांना आकर्षित करत आहे. या फोनमध्ये अत्याधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत, जे त्याला एक स्टायलिश आणि परफॉर्मन्स ओरिएंटेड फोन बनवतात.

फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले: 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1000 निट्स ब्राइटनेससह Corning Gorilla Glass 5 ने संरक्षित.

प्रोसेसर: MediaTek Dimensity 6080 चिपसेटसह वेगवान आणि गतीशील परफॉर्मन्स.

सॉफ्टवेअर: Android 13 वर आधारित.

स्टोरेज आणि रॅम: 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज पर्यायांसह UFS 2.2 स्टोरेज तंत्रज्ञान.

कॅमेरा: 108MP मुख्य कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरासह उत्कृष्ट फोटोग्राफी अनुभव.

डिझाइन: आकर्षक डिझाइन आणि टिकाऊ बिल्ड क्वालिटी.

2024 च्या लॉन्चनंतरचा मोठा डिस्काउंट

जानेवारी 2024 मध्ये लॉन्च झालेला हा फोन आपल्या कॅमेरा क्षमतेसह तसेच उत्कृष्ट डिस्प्ले आणि प्रोसेसरमुळे ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आता फ्लिपकार्टवरील या सूटमुळे हा फोन खरेदी करणे अधिक परवडणारे झाले आहे.

जर तुम्ही ₹15,000 ते ₹20,000 दरम्यानच्या स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर Redmi Note 13 5G ही तुमच्यासाठी एक उत्कृष्ट निवड ठरू शकते. आता फ्लिपकार्टवरील या ऑफरचा लाभ घेत, दमदार फिचर्स असलेला हा फोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी गमावू नका!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : मराठी संघटना आज पोलिस उपायुक्तांची भेट घेणार

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT