Jio Best Recharge Plans Sakal
विज्ञान-तंत्र

Best Recharge Plans: अवघ्या २०० रुपयात महिनाभर सुरू राहील तुमचा मोबाइल नंबर, डेटा-कॉलिंगसह अनेक फायदे

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio कडे २०० रुपयांच्या किंमतीत येणारे शानदार प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहे. प्लॅन्समध्ये अनेक शानदार बेनिफि्स मिळतील.

सकाळ डिजिटल टीम

Reliance Jio Prepaid Plans Under 200: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio कडे २०० रुपयांच्या किंमतीत येणारे शानदार प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहे. २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या या प्लॅन्समध्ये तुम्हाला डेटा, कॉलिंगसह अनेक फायदे मिळतील. जिओच्या या स्वस्त प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Reliance Jio चा १७९ रुपयांचा प्लॅन

जिओच्या १७९ रुपयांच्या प्लॅनची वैधता २४ दिवस आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १ जीबी डेटा याप्रमाणे एकूण २४ जीबी डेटा दिला जातो. डेली डेटा समाप्त झाल्यास ६४ केबीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. याशिवाय, देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस दिले जातात. यामध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

Reliance Jio चा १४९ रुपयांचा प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला २० दिवसांची वैधता मिळेल. यामध्ये दररोज १ जीबी डेटा याप्रमाणे एकूण २० जीबी डेटा दिला जातो. १७९ रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच यात देखील तुम्हाला अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस आणि जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउड अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

हेही वाचा: Flipkart Sale: वर्षातील पहिल्या सेलला सुरुवात, अवघ्या १९९ रुपयात मिळेल उपयोगी वस्तू

Reliance Jio चा २०९ रुपयांचा प्लॅन

जिओकडे २०९ रुपयांचा शानदार प्लॅन देखील उपलब्ध आहे. २८ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १ जीबी डेटा याप्रमाणे एकूण २८ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT