Reliance jio google
विज्ञान-तंत्र

Reliance jioचे ग्राहक आहात ? मग तुम्हाला मिळू शकते १० लाखांचे बक्षीस

कंपनी गेली ६ वर्षे ग्राहकांना 4G सेवा देत आहे त्यामुळे कंपनीला ६ वर्ष झाल्याने ही ऑफर देण्यात आली आहे.

नमिता धुरी

मुंबई : रिलायन्स जिओने नवीन ऑफर काढली आहे, जर तुम्ही जियोचे ६ वर्षांपासून युजर आहात तर तुम्हाला आहे १० लाख रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी. रिलायन्स जिओची 6 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्याच्या वापरकर्त्यांना 10 लाखांपर्यंतचे बक्षीस जिंकण्याची संधी मिळत ​​आहे.

रिलायन्स जिओने त्यांच्या नियमित ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. कंपनी गेली ६ वर्षे ग्राहकांना 4G सेवा देत आहे त्यामुळे कंपनीला ६ वर्ष झाल्याने ही ऑफर देण्यात आली आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. यामध्ये यूजर्सना 10 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस जिंकण्याची संधी आहे. यासाठी त्यांना त्यांचा प्रीपेड नंबर रिचार्ज करावा लागेल.

कंपनीने घोषणा केल्याप्रमाणे ही ऑफर ६ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर अशी चालणार आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आपल्या जिओ प्रीपेड नंबरवर २९९ रुपये किंवा त्याहून जास्त रुपयांचे रिचार्ज करावे लागेल.

ऑफर देशभरात कुठे चालेल हे कंपनीने सांगितलेलं नसलं तरी तामिळनाडू राज्यात ही चालणार नसल्याचे सांगितले आहे म्हणजे बहुदा बाकी सर्वत्र ही ऑफर चालणार असावी.

रिलायन्स जियोने ५ सप्टेंबर २०१६ मध्ये आणली होती Jio 4G सेवा. ह्या ऑफर बद्दल ट्विट करून कंपनीने माहिती दिली असून त्यात इतर तपशील अजून सांगितलेले नाही. आता ह्याला ६ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि कंपनीची ऑफर सुरू झाली आहेत, या ऑफर काळात रिचार्ज केले तर कंपनीकडून बक्षिसे दिली जातील.

जरी तुमचा रिचार्ज प्लॅन आधीपासून सुरू असेल तरी तुम्ही रिचार्ज करू शकता, जुना प्लॅन संपल्यानंतरच नवीन प्लॅन सुरू होईल. आत्ता तरी ही ऑफर फक्त प्रीपेड ग्राहकांना दिली जाते आहे. पोस्टपेड ग्राहकांना ही ऑफर आहे का ह्याबाबत कंपनीने काही सांगितलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT