whatsapp jio mart Sakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp Shopping : व्हॉट्सॲपवरून करा आता 'चॅटींग विथ शॉपिंग'; जिओमार्टची नवी सेवा

सकाळ डिजिटल टीम

किराणा सामान आणण्यासाठी गृहिणींना आता कुणाची मनधरणी करावी लागणार नाही. हे काम आता व्हॉट्सॲपवरून देखील करता येणार आहे. ग्राहक आता या 'चॅटींग विथ शॉपिंग' करत किराणा कॅटलॉग वरून वस्तूची निवड करू शकतील. तसेच व्हॉट्सॲप चॅट सोडून जिओमार्टवर पेमेंट सुद्धा करू शकतील.

(WhatsApp Shopping News)

मेटा आणि जिओ प्लॅटफॉर्मने व्हॉट्सॲपवर जिओमार्टसोबत एन्ड टू एन्ड शॉपिंग एक्सपीरियन्स आणण्यासाठी पार्टनरशीप केली आहे. जिओमार्टसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.

संपूर्णपणे चॅटींगवर पार पाडली जाणारी ही पहिलीच शॉपिंग प्रक्रिया असेल. सध्या बिझनेस मॅसेजिंगचा जमाना आहे. त्यामुळे ग्राहकांनाही शॉपिंग चॅटींगचा अनुभव मिळणे गरजेचे असल्याचे मतही मार्क झुकेरबर्ग यांनी व्यक्त केलं.

अशी करा 'चॅटींग विथ शॉपिंग'

व्हॉट्सॲप ओपन करा आणि जिओमार्ट नंबरवर "Hi" पाठवावे लागेल. आता तुम्हाला "गेट स्टार्टेड" ऑप्शन सोबत एक शुभेच्छा संदेश दिसेल. आता “व्ह्युव कॅटलॉग” वर टॅप करा. आपला ‘पिनकोड’ टाका.

आता कार्ट मध्ये आपल्या पसंतीच्या वस्तू जोडण्यासाठी "+" आयकॉनवर टॅप करा. एकदा प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही वर दिलेल्या उजव्या बाजुच्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर टॅप करून कार्ट मध्ये जावू शकता किंवा स्क्रीनच्या खाली " व्ह्युव कार्ट" ऑप्शनवर टॅप करू शकता.

संकेत मिळाल्यानंतर आता तुम्ही आपला पत्ता देवून कॅश ऑन डिलिव्हरी, पे ऑन जिओ मार्ट, पे ऑन व्हॉट्सॲप यासारखे पेमेंट मोड निवडू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Raj Thackeray: ''2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं..'' राज ठाकरेंचा चिमटा; दोन्ही ठाकरेंसह मुख्यमंत्री एकाच मंचावर

Pune Theft : मार्केटयार्डात डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

Mulshi News : मुळशी तालुक्यात पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT