Disney+Hotstar Free eSakal
विज्ञान-तंत्र

Disney+Hotstar Free : तीन महिने मोफत पाहता येणार डिज्नी+हॉटस्टार.. कशी मिळवाल ही ऑफर?

जिओ सध्या आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा अगदी मोफत देत आहे. यासाठी तुमच्या शहरामध्ये 5G जिओ नेटवर्क उपलब्ध असणं गरजेचं आहे.

Sudesh

Jio Plans with Free Disney+Hotstar : डिज्नी+हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बॉलिवूड आणि हॉलिवूडचे कित्येक सिनेमे आणि वेब सीरीज उपलब्ध आहेत. मार्व्हलच्या नवीन सीरीज देखील केवळ याच ओटीटीवर एक्सक्लुझिव उपलब्ध आहेत. तुम्ही जर रिलायन्स जिओ यूजर असाल, तर या सर्व कंटेंटचा आनंद तुम्ही अगदी मोफत मिळवू शकता.

रिलायन्स जिओने आपल्या 388 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ही ऑफर दिली आहे. या रिचार्जवर तुम्हाला 3 महिन्यांपर्यंत डिज्नी+हॉटस्टार सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. सोबतच यामध्ये 28 दिवसांपर्यंत 2GB डेटा, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचं सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे. (Jio Plans with OTT)

जिओच्या इतर प्लॅन्समध्ये देखील अशाच प्रकारच्या ऑफर्स आहेत. 598 रुपयांच्या प्लॅनवर तब्बल एक वर्षासाठी डिज्नी+हॉटस्टार सबस्क्रिप्शन मोफत मिळत आहे. यासोबतच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचं सबस्क्रिप्शन देखील या प्लॅनमध्ये मिळत आहे. 28 दिवस व्हॅलिडिटी असणाऱ्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, रोजचे 100 मेसेज आणि दिवसाला 2GB डेटा मिळत आहे.

डिज्नीच्या 808 रुपयांच्या प्लॅनमध्येही 3 महिने डिज्नी+हॉटस्टार सबस्क्रिप्शन आणि वरील सर्व बेनिफिट्स मिळत आहेत. या प्लॅनची वैधता 84 दिवस आहे. तसंच, 1,198 रुपयांच्या प्लॅनमध्ये डिज्नी+हॉटस्टार, अमेझॉन प्राईम व्हिडिओ, सोनी लिव्ह, झी 5, प्लॅनेट मराठी यांसह तब्बल 14 ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन मिळतं. या प्लॅनची वैधता 84 दिवस आहे.

अनलिमिटेड डेटा

दरम्यान, जिओ सध्या आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा अगदी मोफत देत आहे. यासाठी तुमच्या शहरामध्ये 5G जिओ नेटवर्क उपलब्ध असणं गरजेचं आहे. तसंच, तुमचा स्मार्टफोन देखील 5G असणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT