Airtel, Vodafone Idea and jio Daily are the best plans with 2GB data 
विज्ञान-तंत्र

दररोज 2GB डेटासह Jio, Vi अन् Airtel चे सर्वात स्वस्त प्लॅन, पाहा यादी

सकाळ डिजिटल टीम

दिग्गज दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ(Jio) , व्होडाफोन-आयडिया (Vi) आणि एअरटेल (Airtel) तुम्हाला दररोज 2GB डेटासह अनेक प्लॅन देतात. ज्यामध्ये तुमच्या सर्व गरजा पुरवल्या जातात. आज आपण तिन्ही कंपन्यांच्या (रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्ही) सर्वात स्वस्त 2 जीबी डेटा प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत.

Reliance Jio : 7.8 रुपयांमध्ये प्रतिदिन 2 GB डेटा

हा दीर्घ वैधता आणि प्रतिदिन 2 GB डेटा ऑफर करणाऱ्या रिलायन्स जिओच्या प्लॅनपैकी एक आहे. कंपनी 2879 रुपयांमध्ये 365 दिवसांची वैधता देते. म्हणजेच एका दिवसाचा खर्च 7.8 रुपये आहे. प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे एकूण डेटा 730 GB मिळेल. यासोबतच ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात. प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शनही दिले जाते.

व्होडाफोन आयडिया (Vi) : 9.6 रुपयांमध्ये दररोज 2 GB डेटा

Vodafone-idea कडे दररोज 2 GB डेटासह मर्यादित प्लॅन आहेत. यापैकी एक प्लॅन 539 रुपयांचा आहे, ज्यामध्ये 56 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. अशा प्रकारे एका दिवसाचा खर्च 9.6 रुपये आहे. प्लॅनमध्ये एकूण 112 जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात. याशिवाय, Binge All Night, Weekend Data Rollover, Data Delight आणि Vi Movies & TV Classic मध्ये मोफत एक्सेस दिला जातो.

Airtel : 8.2 रुपयांमध्ये प्रतिदिन 2 GB डेटा

Airtel च्या या प्लॅनची ​​किंमत 2,999 रुपये आहे, ज्यामध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. म्हणजेच एका दिवसाचा खर्च 8.2 रुपये होतो. प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे एकूण डेटा 730 GB मिळेल. यासोबतच ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात. ग्राहकांना डिस्ने+ हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन, फ्री हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिक फ्री यासारखी सब्ससिक्रिप्शन मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs PBKS Live: अर्जुन तेंडुलकरला अखेर पदार्पणाची संधी मिळाली! पंजाब किंग्सच्या तगड्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान

Thane: ठाणे स्टेशनचा चेहरामोहरा बदलणार! प्रवाशांसाठी आधुनिक सुविधांचा मोठा विस्तार होणार; प्रवाशांना मोठा फायदा मिळणार

Marathi Live News update: बीडच्या परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे 2 गटात राडा

कुणाला २० हजार तर कुणाला १ लाख... हास्यजत्राच्या कलाकारांना किती मानधन मिळतं? पृथ्वीक प्रतापने केला खुलासा

Suryakumar Yadav: चाचपडणारा सूर्यकुमार, BCCI ला झालाय नकोसा, पण एका व्यक्तीमुळे अंतिम निर्णय रखडलाय; कोण आहे तो?

SCROLL FOR NEXT