Republic Day 2024 IAF Show eSakal
विज्ञान-तंत्र

Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर हवाई दलाची चित्तथरारक प्रात्यक्षिकं; पाहा व्हिडिओ

यावेळी हवाई दलाचे हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमानांनी विविध प्रकारचे फॉर्मेशन केले. याची सुरुवात हेलिकॉप्टर्सच्या अ‍ॅरो फॉर्मेशनने झाली.

Sudesh

IAF at Kartavya Path : भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर भव्य सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांची सांगता भारतीय हवाई दलाच्या थरारक प्रात्यक्षिकांनी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रमुख पाहुणे इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या डोक्यावरुन ही विमाने उडत गेली.

यावेळी हवाई दलाचे हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमानांनी विविध प्रकारचे फॉर्मेशन केले. याची सुरुवात हेलिकॉप्टर्सच्या अ‍ॅरो फॉर्मेशनने झाली. यामध्ये अगदी सुरुवातीला LCH हेलिकॉप्टर होतं, त्यामागे दोन अपाचे हेलिकॉप्टर्स आणि दोन Mk-4 एअरक्राफ्ट असे एकूण पाच हेलिकॉप्टर या फॉर्मेशनमध्ये होते.

यानंतर सहा राफेल विमानांनी 'मारुत' फॉर्मेशनमध्ये कर्तव्य पथावरुन उड्डाण केलं. तसंच, एक डकोटा आणि दोन डोर्निअर एअरक्राफ्ट यांच्या मदतीने हवाई दलाने व्हिक फॉर्मेशनमध्ये प्रात्यक्षिक दाखवलं. या प्रात्यक्षिकांची विशेष रेकॉर्डेड व्हिजुअल्स भारतीय हवाई दलाने शेअर केली आहेत.

यानंतर तीन Su-30 मार्क-1 विमानांनी 'त्रिशूळ' फॉर्मेशन करुन दाखवलं. ही लढाऊ विमानं तब्बल 900 किलोमीटर प्रतितास एवढ्या वेगाने उडत होती. त्यानंतर याच वेगाने एक राफेल विमान कर्तव्यपथावरुन उडत गेलं. यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सांगता झाल्याचं घोषित करण्यात आलं.

या सोहळ्याची सांगता झाल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू आणि प्रमुख पाहुणे इमॅन्युएल मॅक्रॉन हे राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाले. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थितांना अभिवादन करत तिथून रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT