Spacesuit Technology Recycles Urine into Drinkable Water esakal
विज्ञान-तंत्र

Spacesuit Research : अंतराळवीरांना पाण्याच्या कमतरतेचं आता नो टेंशन! संशोधकांनी बनवलं खास स्पेससूट, कशापासून बनवणार पाणी?

Urine Recycle Spacesuit : आत्तापर्यंत अंतराळयात्रींना अंतराळात पाण्याची कमतरता जाणवत होती. पण आता नव्या स्पेससुटच्या संशोधानानंतर हे चित्र बदलणार आहे.

Saisimran Ghashi

Space Research : आत्तापर्यंत अंतराळयात्रींना अंतराळात पाण्याची कमतरता जाणवत होती. पण आता हे चित्र बदलणार आहे. विज्ञान जगतात आणखी एका क्रांतिकारी संशोधनाची भर पडली आहे. अमेरिकेच्या वेइल कॉर्नेल मेडिसिन आणि कॉर्नेल विद्यापीठातील संशोधकांनी अंतराळवीरांच्या वापरासाठी एक विशेष प्रकारचा स्पेससूट विकसित केला आहे. हा सूट अगदी कमी वेळात मूत्रापासून स्वच्छ पिण्याचे पाणी तयार करू शकतो.

“ड्यून” या सायन्स फिक्शन चित्रपटात दाखविल्याप्रमाणे पाणी पुनर्प्राप्त करणारा सूट (stillsuit) या नवीन सूटची प्रेरणा आहे. हा सूट मूत्र गोळा करतो, ते शुद्ध करतो आणि पाच मिनिटांच्या आत एका पाईपद्वारे थेट अंतराळवीरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देतो. NASAच्या आर्टेमिस प्रोग्राम अंतर्गत दीर्घ अंतराळ प्रवासांसाठी हा सूट उपयुक्त ठरणार आहे. या महत्वाकांक्षी कार्यक्रमाअंतर्गत NASA चा उद्देश २०२६ पर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आणि २०३० पर्यंत मंगळावर अंतराळवीरांना पाठविणे आहे.

सोफिया एटलिन यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी हा सूट विकसित केला आहे. एटलिन यांच्या म्हणण्यानुसार, “आतापर्यंत अंतराळवीरांच्या सूटमध्ये फक्त एक लिटर पाण्याची सोय असते. पण येत्या काळात नियोजित असलेल्या दीर्घ अंतराळ यात्रांसाठी (१० तासांपर्यंत) आणि अत्यावश्यक परिस्थितींमध्ये (२४ तासांपर्यंत) हे पुरेसे नसते.”

आत्तापर्यंत अंतराळवीर अंतराळात मलमूत्र गोळा करण्यासाठी अत्यंत अस्वस्थ आणि गळती होणारे कपडे वापरायचे. या नवीन सूटमुळे अंतराळातील कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होणार आहे. हा सूट आकारात लहान आणि वजनात हलका (८ किलो) असून वापरण्यास सोयीस्कर आहे. त्यामुळे अंतराळवीरांच्या सूटमध्ये सहज बसवता येतो.

न्यूयॉर्कमध्ये हा सूट स्वयंसेवी लोकांवर चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचण्यांमध्ये सूटची कार्यक्षमता आणि सुरक्षा तपासली जाणार आहे. सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर या सूटचा प्रत्यक्ष अंतराळ मोहिमांमध्ये वापर केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prada Kolhapuri Chappal : ‘प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायरर्ड बाय कोल्हापुरी चप्पल’, कापशी पायतानचा ब्रॅण्ड प्राडाने स्वीकारला

Chhatrapati Sambhajinagar: न्यूझीलंडशी कराराने उद्योगांना बळ; मराठवाड्यातील उद्योजकांकडून स्वागत

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर :शेंद्रा एमआयडीसीतील स्क्रॅप गोडवूनला भीषण आग

Ramdas Athawale: ‘भोंदूगिरी रोखण्यासाठी बुवा-बाबांची चौकशी व्हावी’: राज्यमंत्री रामदास आठवले, शिवाजी महाराजांवरील वक्तव्य वादग्रस्त!

Police Bribery Case Kolhapur : भुदरगड पोलिस ठाण्याच्या हवालदाराने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारली अन्, रात्री उशिरा नाट्यमय घडामोडी, कारणही धक्कादायक

SCROLL FOR NEXT