Sahara Desert eSakal
विज्ञान-तंत्र

Sahara Desert : सहारा वाळवंटाच्या जागी एकेकाळी होतं घनदाट जंगल; अचानक कुठे झालं गायब? वैज्ञानिकांनी लावला शोध

World's largest Desert : आफ्रिका खंडात असणारं हे वाळवंट 9,400 वर्ग मैल एवढं पसरलं आहे.

Sudesh

Forest in Sahara : सहारा हे जगातील सर्वात मोठं वाळवंट म्हणून ओळखलं जातं. आफ्रिका खंडात असणारं हे वाळवंट 9,400 वर्ग मैल एवढं पसरलं आहे. मात्र, या वाळवंटाच्या जागी एके काळी घनदाट जंगल होतं, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर?

ऐकायला खरं वाटत नसलं. तरी हे पूर्णपणे सत्य आहे. या वाळवंटाच्या ठिकाणी एके काळी घनदाट जंगले आणि प्राणी होते. तसंच याठिकाणी मानवी वस्तीदेखील होती असं संशोधकांनी म्हटलं आहे. या ठिकाणी मोठे तलाव देखील होते, असंही रिसर्चमध्ये समोर आलं आहे.

वैज्ञानिकांनी सांगितलं, की हे सगळं सहा हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होतं. नॅशनल जिओग्राफिक चॅनलने याबाबत एक रिपोर्ट देखील प्रसिद्ध केला आहे. शिकागो विद्यापीठाच्या संशोधकांच्या एका पथकाने हा मोठा शोध लावला होता.

कसा लागला शोध?

शिकागो विद्यापीठाचं हे पथक दक्षिण-पूर्व अल्जेरियामध्ये डायनासॉरच्या अवशेषांचा शोध घेत होती. यावेळी त्यांना कित्येक मानवी हाडांचे सांगाडे आणि इतर प्राण्यांचे सांगाडेही मिळाले. विशेष म्हणजे, याठिकाणी मासे आणि मगर अशा जीवांचे अवशेष देखील मिळाले. वाळवंटाजवळ अशा प्राण्यांचे अवशेष मिळाल्यामुळे वैज्ञानिकांनी याबाबत अधिक संशोधन केलं.

मानवांचे दोन समूह

अधिक संशोधनात असं दिसून आलं, की सहारा वाळवंटाच्या ठिकाणी मानवांचे किफियन आणि टेनेरियन असे दोन समूह राहिले आहेत. किफियन समूह हा इसवी सन पूर्व 7,700 ते 6,200 दरम्यान याठिकाणी राहत होते. तर, टेरेनियन समूह हा इसवी सन पूर्व 5,200 ते 2,500 सालापर्यंत याठिकाणी राहत होते.

कशामुळे झालं वाळवंट?

इतिहास आणि हवामान संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, सहारा वाळवंट हे शेकडो वर्षांच्या कालावधीत तयार झालं आहे. पृथ्वीच्या कक्षेत झालेल्या बदलामुळे याठिकाणचं हवामान बदललं. त्यामुळे याठिकाणी हळू-हळू वाळवंट तयार होत गेलं असं मानलं जातं. सोबतच, याला ग्लोबल वॉर्मिंग - म्हणजेच जागतिक तापमानवाढ देखील कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : कोल्हापुरात बेल्टने मारहाण करत 20 वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भीती घालून दोन वर्षांपासून ठेवले शारीरिक संबंध

Chhatrapati Sambhajinagar: व्यावसायिकाला डोळ्यात मिरची पूड टाकून लुटले; जेवणाची ऑर्डर देण्यासाठी बोलावले;दागिन्यासह रोख रक्कम पळविली

Latest Marathi News Live Update : दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज विजांसह वादळी पावसाची शक्यता

Sangola Accident: घराच्या थोड्याच अंतरावर काळाचा घाला! टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दांपत्य ठार; सांगोला-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात..

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट ! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पाऊस तर 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट

SCROLL FOR NEXT