#RIPCartoonNetwork Sparks Shutdown Rumors on X esakal
विज्ञान-तंत्र

RIP Cartoon Network : कार्टून नेटवर्कच्या चाहत्यांना धक्का! चॅनेल बंद होणार असल्याचं ट्विट होतंय व्हायरल, कंपनीने दिलं स्पष्टीकरण

Cartoon Channel Closed : जागतिक स्तरावरील कार्टून नेटवर्कच्या चाहत्यांना सोशल मीडियावर #RIPCartoonNetwork ची ट्रेंड वाढल्याने त्यांच्यामध्ये काळजी निर्माण झाली आहे.

Saisimran Ghashi

Cartoon Network : जागतिक स्तरावरील कार्टून नेटवर्कच्या चाहत्यांना सोशल मीडियावर #RIPCartoonNetwork ची ट्रेंड वाढल्याने त्यांच्यामध्ये काळजी निर्माण झाली आहे. यामुळे काही लोक कार्टून नेटवर्क बंद होणार असंही बोलून लागले आहेत.

ट्विटरवर 'Animation Workers Ignited' या नावाच्या हँडलने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये "Cartoon Network is dead?!?!" असं म्हटलं होतं. यामुळे ही ट्रेंड सुरू झाली. त्यांनी इतर अनेक स्टुडिओमध्येही अशीच परिस्थिती असून अनेक अॅनिमेशन कलाकार बेरोजगार होत असल्याचे सांगितले आहे.

कोरोनाच्या काळात अॅनिमेशन इंडस्ट्री काम करू शकली कारण तेथे घरूनही काम करता येतं. पण आता मोठ्या स्टुडिओ त्यांच्या खर्च कमी करण्यासाठी अनेक प्रोजेक्ट बंद करत आहेत आणि कलाकारांना काढून टाकत आहेत. अशा परिस्थितीमुळे हा व्हिडिओ बनवण्यात आला होता.

पण चिंता करण्याची गरज नाही.कारण कार्टून नेटवर्क बंद होणार नाही. हे चॅनेल पूर्वीसारखेच चालू राहील. फक्त काही बदल केले जाणार आहेत,अशी माहिती कंपनीने दिली आहे.जसे की Adult Swim ची वेळ दोन तास आधी करण्यात आली आहे. तसेच या चॅनेलसाठी नवीन कार्यक्रम बनवण्याचे काम सुरू आहे. The Amazing World of Gumball: The Series या वर्षी प्रदर्शित होणार आहे. Adventure Time, Regular Show आणि Fosters Home of Imaginary People यांच्या स्पिन-ऑफवर काम सुरू आहे.

कार्टून नेटवर्कवर कोरोनाचा काही परिणाम झाला आहे आणि काही कर्मचाऱ्यांची कपात झाली आहे. पण तरीही हे चॅनेल बंद होणार नाही. कंपनी कशी चालवली जात आहे यावर टीका होत असली तरी, अजूनही बरेच काही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dress Code: कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड सक्तीचा; राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या कपड्यांवर बंदी? जाणून घ्या...

Mumbai News: मुंबईकरांना मोठा दिलासा! मढ ते वर्सोवा अवघ्या १० मिनिटांत पोहोचणार; केबल पूल लवकरच सुरु होणार

Nashik Municipal Election : निवडणुकीपूर्वीच उमेदवारांना महागाईचा झटका! चहा-नाश्त्यापासून बॅनरपर्यंतचे नवीन दर जाहीर

Kagal Accident : महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने कार, दोन बैलगाड्या आणि मोटरसायकल चिरडल्या...

Ichalkaranji Municipal : इचलकरंजीच्या राजकारणात मोठा बदल; महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘हात’ चिन्ह गायब

SCROLL FOR NEXT