true gpt
true gpt sakal
विज्ञान-तंत्र

टेक्नोहंट : चॅटजीपीटी, बार्ड आणि आता ट्रूथ जीपीटी

ऋषिराज तायडे

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) मदतीने विविध प्रकारचे नव तंत्रज्ञान विकसित होत आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) मदतीने विविध प्रकारचे नव तंत्रज्ञान विकसित होत आहेत. ओपनएआयने आणलेल्या ‘चॅटजीपीटी’ला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता गुगलनेही ‘बार्ड’ हे चॅटबोट लॉन्च करण्याची घोषणा केली होती. चॅटबोट क्षेत्रात हुकूमत गाजवण्यासाठी या दोन्ही कंपन्या सज्ज असताना आता ट्विटर तथा स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांनीही या क्षेत्रात उडी मारण्याची घोषणा केली आहे.

मागील अनेक महिन्यांपासून आपण चॅटजीपीटीबद्दल बरंच ऐकतोय. आर्टिफिशिअल इंटिलिजन्सवर आधारित ही चॅटबोट सेवा तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे म्हणजे एखाद्या विषयाबद्दल माहिती शोधण्यापासून ते नोकरीसाठी रेझ्युमे तयार करणे असो किंवा कॉम्प्युटर प्रोग्रामिंग करणे असो... अगदी सहजपणे उत्तरे देतो. त्यामुळे ‘चॅटजीपीटी’ची वाढती लोकप्रियता पाहता गुगलनेही ‘बार्ड’ ही नवी चॅटबोट सेवा सुरू करण्याची घोषणा केली.

‘बार्ड’ ही गुगलची चॅटबोट सेवा लॅम्डा अर्थात Language model dialogue application वर आधारित असून ते गुगलकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे काम करणारे आहे. सध्या बार्ड टेस्टिंग मोडवर असून ते लवकरच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार असल्याचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितले होते. चॅटबोट क्षेत्रातील ओपन एआय आणि गुगल यांच्या स्पर्धेत आता उद्योगपती एलॉन मस्क यांनीही उडी मारण्याची घोषणा केली.

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील नव्या संधी हेरण्यासाठी मस्क यांनी ‘ट्रूथ जीपीटी’ ही नवी सेवा सुरू करण्याची घोषणा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली. त्यासाठी त्यांनी ‘एक्स.एआय’ ही कंपनी स्थापन केल्याचेही सांगितले. मायक्रोसॉफ्टच्या पाठिंब्याने सुरू झालेल्या ओपन एआय कंपनीने चॅटबोट सेवेला त्यांनी खोटी; तसेच कंपनीला फायदेशीर असलेलीच माहिती देण्याचे प्रशिक्षण दिल्याची टीका मस्क यांनी केली. त्यामुळे मी ग्राहकांनी अधिकाधिक वास्तविक माहिती देण्यासाठी ट्रूथ जीपीटी ही सेवा सुरू करत असल्याचे सांगितले.

दरम्यान, मस्क यांनी यापूर्वी २०१५ मध्ये ओपन एआयमध्ये गुंतवणूक केली होती. त्यावेळी ते कंपनीचे संचालक मंडळाचे सदस्यही होते; मात्र काही कारणास्तव त्यांनी २०१८ मध्ये पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी टेस्ला कंपनीच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात लक्ष घालण्यास सुरुवात केली. आता त्यासाठी त्यांनी ‘एक्स.एआय’ या स्वतंत्र कंपनीची स्थापना केली असून लवकरच ते ‘ट्रूथ जीपीटी’ ही नवी चॅटबोट सेवा सुरू करणार असल्याचे म्हटले आहे.

चॅटजीपीटी, बार्ड आणि ट्रूथ जीपीटीमध्ये फरक काय?

1) मायक्रोसॉफ्टचं पाठबळ असलेली चॅटजीपीटी ही हल्ली प्रचंड लोकप्रिय होत असली, तरी चॅटजीपीटीकडे मर्यादित माहिती आहे. दुसरीकडे गुगलकडे सर्च इंजिन म्हणून माहितीचा प्रचंड साठा आहे, त्याचा वापर करून बार्ड काम करणार आहे.

2) चॅटजीपीटी सध्या नवी असल्याने त्याद्वारे मिळणाऱ्या उत्तरांमध्ये फॅक्ट्स, आकडेवारीबाबत हवी तेवढी विश्वासार्हता नाही, त्यातुलनेत गुगलकडे भरपूर माहितीचा खजिना असल्याने बार्डकडून अधिक अचूक उत्तरे मिळतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

3) सोईस्कर माहिती युजर्सना देण्याचे प्रशिक्षण ओपनएआयने चॅटजीपीटीला दिल्याची टीका मस्क यांनी केल्यानंतर अधिकाधिक वास्तविक माहिती ‘ट्रूथ जीपीटी’कडून देण्याचा प्रयत्न असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT