भारतात दर आठवड्याला नवे स्मार्टफोन लॉन्च होत असतात. एकीकडे प्रीमियमची क्रेझ वाढत असतानाही बजेट आणि मिड-रेंजमधील स्मार्टफोनलाही मोठी मागणी आहे.
भारतात दर आठवड्याला नवे स्मार्टफोन लॉन्च होत असतात. एकीकडे प्रीमियमची क्रेझ वाढत असतानाही बजेट आणि मिड-रेंजमधील स्मार्टफोनलाही मोठी मागणी आहे. साधरणतः १० ते १५ हजार रुपयांदरम्यान किंमत असलेल्या स्मार्टफोनला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचेही समोर आले आहे. ही बाब लक्षात घेता या परवडणाऱ्या दरात काही नवे स्मार्टफोन नुकतेच लॉन्च झाले आहेत, त्यांबाबत...
लावा ब्लेझ
लावा या भारतीय स्मार्टफोन ब्रँडने स्टायलिश डिझाइन, उत्कृष्ट कामगिरी आणि प्रीमिअम वैशिष्ट्ये असलेला ‘ब्लेझ’ हा नवाकोरा बजेट सीरिजमधील स्मार्टफोन नुकताच भारतात लॉन्च केला. ग्लासबॅक डिझाईन, डबल व्हर्चुअल रॅम, बॉटम फायरिंग स्पीकर्स आदी फीचर्स असलेला हा स्मार्टफोन अवघ्या ८,६९९ रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. तसेच ‘ब्लेझ’मध्ये मीडियाटेक हेलियो ए22 प्रोसेसर, 5000 एमएएच बॅटरी आणि १० वॉट टाइप-सी फास्ट चार्जर या सुविधा देण्यात आल्या आहेत.
टेक्नो कॅमोन 19
भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांत टेक्नो या स्मार्टफोन ब्रॅण्डची बरीच चर्चा आहे. किफायतशीर दरात उत्तमोत्तम फीचर्स देण्यात येत असल्याने टेक्नोच्या स्मार्टफोनला बरीच मागणी वाढली आहे. त्यातच आता टेक्नोने कॅमोन 19 आणि कॅमोन 19 नियो हे दोन स्मार्टफोन नुकतेच भारतात लॉन्च करण्यात आले. 6 GB रॅमसोबतच 5GB व्हर्चुअल रॅम देण्यात आल्याने या स्मार्टफोनमध्ये जवळपास एकूण 11GB देण्यात आली आहे.
Itel A23s
आयटेलने नुकताच सर्वांत स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉन्च केला. अवघ्या 5299 रुपयांमध्ये आयटेलने अॅण्ड्रॉईड स्मार्टफोन उपलब्ध केला आहे. प्राथमिक पातळीवर या स्मार्टफोनमध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोअरेज दिले असले, तरी मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून या स्मार्टफोनची मेमरी स्टोअरेज वाढवता येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.