Samsung Galaxy Smartphone Sakal
विज्ञान-तंत्र

Samsung Galaxy: सॅमसंग गॅलक्सी S-23,S-23 plus, S-23 Ultra; काय नेमका फरक ? जाणून घ्या वैशिष्ट्ये

सॅमसंगची बहुप्रतीक्षित गॅलेक्सी एस-23 सीरिज नुकतीच भारतात लॉन्च करण्यात आली.

ऋषिराज तायडे

सॅमसंगची बहुप्रतीक्षित गॅलेक्सी एस-23 सीरिज नुकतीच भारतात लॉन्च करण्यात आली.

सॅमसंगची बहुप्रतीक्षित गॅलेक्सी एस-23 सीरिज नुकतीच भारतात लॉन्च करण्यात आली. ‘गॅलेक्सी अनपॅक्ड’ या मेगा इव्हेंटमध्ये सॅमसंगने गॅलेक्सी एस-23, गॅलेक्सी एस-23 प्लस आणि गॅलेक्सी एस-23 अल्ट्रा हे तीन स्मार्टफोन लॉन्च केले. या स्मार्टफोनमधील खास फीचर्सबाबत थोडक्यात...

खास FHD+ Dynamic AMOLED डिस्प्ले आणि Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर असलेले हे तिन्ही स्मार्टफोन अॅण्ड्रॉईड 13 वरील OneUI 5.1 ने सुसज्ज आहेत. या तिन्ही स्मार्टफोनपैकी एस-23 आणि एस-23 प्लसमधील बहुतांश फीचर्स सारखे असून केवळ डिस्प्ले साईजमध्ये थोडाफार फरक आहे. दोन्ही फोनमध्ये 50 मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप आणि 12 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळतो; मात्र सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय ते एस-23 अल्ट्राने.

या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंची FHD+ Dynamic AMOLED डिस्प्ले आणि तब्बल 200 मेगापिक्सल क्वाडकॅमेरा सेटअप तोही ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह. त्यामुळे फोटोग्राफीचा द नेक्स्ट लेव्हल एक्सपेरियन्स मिळतो. फ्रंट कॅमेऱ्यातील रात्रकालीन फोटोग्राफीसाठी खास नायटोग्राफी मोड, अवकाशातील तारे-तारका टिपण्यासाठी अॅस्ट्रोमोड आणि ड्युएल पिक्सल ऑटो फोकसमुळे अचूक सेल्फी काढता येतात.

उत्तम ग्राफिक्स, अडाप्टिव्ह व्हिजन बूस्टर आणि अत्याधुनिक व्हेपर कुलिंग चेंबरमुळे गॅलेक्सी एस-23 मध्ये गेमिंगचा अफलातून अनुभव मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT