Luna 25 Launch eSakal
विज्ञान-तंत्र

Luna 25 Launch : ४७ वर्षांनंतर रशियाची मोठी चांद्रमोहीम; 'लूना-२५'चं यशस्वी प्रक्षेपण! 'चांद्रयान-३' पूर्वी पोहोचणार चंद्रावर

Luna-25 : साधारणपणे २१ किंवा २२ तारखेला हे यान चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे.

Sudesh

Russia Moon Mission : रशियाने आज पहाटे आपलं 'लूना-२५' हे यान अवकाशात प्रक्षेपित केलं. तब्बल ४७ वर्षांमध्ये रशियाची ही पहिलीच चांद्रमोहीम असणार आहे. या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण भागात उतरण्याचा प्रयत्न रशिया करेल.

आज (११ ऑगस्ट) पहाटे ४.४० वाजता (भारतीय वेळेनुसार) अमूर ओब्लास्टजवळ असणाऱ्या वोस्टोनी कॉस्मोड्रोम फॅसिलिटीमधून हे प्रक्षेपण करण्यात आलं. यासाठी सोयूज २.१बी या रॉकेटची मदत घेण्यात आली.

पाच दिवसात पोहोचणार चंद्रावर

सोयूज रॉकेटने 'लूना-२५'ला पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत सोडलं. यानंतर हे यान चंद्राच्या दिशेने निघालं. सुमारे ५.५ दिवसांमध्ये हे यान चंद्राच्या जवळ पोहोचेल. त्यानंतर चंद्राच्या कक्षेमध्ये हे यान सुमारे तीन ते सात दिवस असणार आहे. साधारणपणे २१ किंवा २२ तारखेला हे यान चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. (Russia Luna-25)

दक्षिण भागात उतरणार

चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किलोमीटर उंचीवर राहून हे यान आपल्या लँडिंगच्या ठिकाणापर्यंत पोहोचेल. चंद्राच्या बोगुस्लावस्की क्रेटर या भागात लूना-२५ लँडिंग करेल. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून, चंद्रावरील मातीचं परिक्षण करणं हे 'लूना-२५'चं मिशन असणार आहे.

चंद्रावर करणार खोदकाम

चंद्राच्या मातीचं परिक्षण करण्यासाठी लूना-२५ मध्ये ३१ किलोची उपकरणं बसवण्यात आली आहेत. या यानाचं एकूण वजन तब्बल १.८ टन आहे. यातील एक खास यंत्र चंद्रावर सहा इंच खोलपर्यंत खोदकाम करण्यासाठी सक्षम आहे. चंद्रावरील 'फ्रोजन वॉटर', म्हणजेच बर्फावस्थेत असणारं पाणी शोधण्यासाठी हे यान तिथली माती आणि दगडांचे सॅम्पल गोळा करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT