Astronauts at Space Station eSakal
विज्ञान-तंत्र

ISS : अमेरिका आणि रशियाचे अंतराळवीर पोहोचले स्पेस स्टेशनला; एक वर्षाचं असणार मिशन

Astronauts at Space Station : शुक्रवारी कझाकिस्तानातील बैकोनूर कॉस्मोड्रोम येथून या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं.

Sudesh

अमेरिका आणि रशियाचे तीन अंतराळवीर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर पोहोचले आहेत. एका रशियन रॉकेटमधून या तिघांना अंतराळात पाठवण्यात आलं. शुक्रवारी (15 सप्टेंबर) कझाकिस्तानातील बैकोनूर कॉस्मोड्रोम येथून या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं.

या मोहिमेत नासाच्या महिला अंतराळवीर लॉरेल ओहारा यांच्यासह रॉस्कॉस्मॉसचे कॉस्मोनॉट ओलेग कोनोनेन्को आणि निकोलाई चुब हे तिघे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणार आहेत. यातील ओहारा या सहा महिन्यांसाठी स्पेस स्टेशनवर असणार आहेत. तर रशियाचे ओलेग आणि निकोलाई हे एका वर्षासाठी ISS वर राहतील.

आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ओहारा आणि चुब यांचा हा पहिलाच अंतराळ दौरा असणार आहेत. तर या मोहिमेचे मिशन कमांडर कोनोनेन्को आतापर्यंत चार वेळा अंतराळात जाऊन आले आहेत. कोनोनेन्को यांचं एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते अंतराळात सर्वाधिक काळ राहिलेले व्यक्ती ठरतील.

स्थानिक वेळेनुसार, शुक्रवारी रात्री 8:44 मिनिटांनी या तिघांना नेणाऱ्या रॉकेटचं प्रक्षेपण झालं. यासाठी रॉस्कॉस्मॉसचं सोयूज एमएस-24 हे अंतराळयान वापरण्यात आलं. प्रक्षेपणानंतर साधारणपणे तीन तासांनंतर हे तिघे स्पेस स्टेशनवर पोहोचले.

इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर सध्या अमेरिका, रशिया, डेन्मार्क आणि जपानचे सात अंतराळवीर उपस्थित आहेत. यात आता तिघांची भर पडली आहे. सप्टेंबरच्या शेवटी अंतराळ स्थानकामध्ये आधीपासून असलेल्यांपैकी तीन अंतराळवीर पृथ्वीवर परत येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : पुणे बेंगलोर महामार्गावर वाकड येथे गॅस टँकरला ट्रकने दिली मागून जोरदार धडक, टँकर मधून गॅस गळती

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

Navratri Festival : आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ;घटस्थापनेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त

Tuljabhavani Temple: तुळजापूरला नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ;तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज घटस्थापना

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

SCROLL FOR NEXT