russia will introduce rossgram app as replacement of Instagram amid war with ukraine  esakal
विज्ञान-तंत्र

रशियाचे मेटाला प्रत्युत्तर; लवकरच Rossgram घेणार इंस्टाग्रामची जागा

सकाळ डिजिटल टीम

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर जगभरातून रशियावर बंदी घालण्यात येत आहे. यातच काही दिवसांपुर्वी रशियाने इंस्टाग्राम ॲपवर बंदी घातली आहे. दरम्यान यामुळे लवकरच इंस्टाग्रामला पर्याय म्हणून रॉसग्राम (Rossgram) हे नवीन ॲप सादर करण्याची घोषणा करण्यात आली आहे. रॉसग्राम ॲप रशियामध्ये 28 मार्च रोजी लॉन्च होणार आहे. Instagram हा एक व्हिडिओ आणि फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे, मेटा या कंपनीच्या मालकीचा प्लॅटफॉर्म आहे. इंस्टाग्रामप्रमाणेच रॉसग्राम ॲपमध्येही अनेक फीचर्स देण्यात येणार आहेत.

रशियामध्ये इंस्टाग्रामवर बंदी का आली?

इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. मेटाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर रशियाविरूद्ध पोस्ट करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये रशियन सैनिकांना मृत्यू हा शब्दही वापरण्यास मोकळीक दिली आहे. मात्र इतर प्रकरणांमध्ये असे शब्द वापरल्यास त्याला Facebook हेट स्पिच किंवा द्वेष परवणारा कंटेंट ठरवतो. पण Meta च्या वतीने युक्रेनमधील लोकांसाठी फेसबुकची हेट स्पीच पॉलिसी बदलण्यात आली. कंपनीने फेसबुकवर "रशियन आक्रमणकर्त्यांचा मृत्यू" सारख्या पोस्ट करण्याला परवानगी दिली. मेटाच्या वतीने असे म्हटले आहे की, हा युक्रेनच्या लोकांच्या रशियन लष्करी दलाविरुद्धच्या प्रतिकाराचा भाग आहे, त्यामुळे रशियाने इंस्टाग्राम ॲपवर बंदी घातली आहे आणि इंस्टाग्रामच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत.

रॉसग्राम ॲपमध्ये काय असेल खास

रॉसग्राम ॲपमध्ये पेड ऍक्सेस आणि क्राउडफंडिंग सारखे फीचर्स दिले जातील, जे Instagram सारखेच असेल. लीक झालेल्या रिपोर्टनुसार रॉसग्रामचा लेआउट आणि रंग देखील काहीसा इंस्टाग्रामसारखा असेल. विशेष म्हणजे, अमेरिकन टेक कंपन्यांच्या निर्बंधानंतर रशिया या प्लॅटफॉर्म्ससाठी देशांतर्गत तंत्रज्ञान विकसित करत आहे. रशियाच्या आधी भारताने देखील देशवासीयांना देशांतर्गत तंत्रज्ञान स्वीकारण्यास सांगितले होते. सीमेवर तणाव असताना देशाची सुरक्षा आणि अखंडता लक्षात घेऊन भारत सरकारने अनेक चिनी अॅपवर बंदी घातली होती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT