before sale laptop smartphone and computer remember these important thing Marathi article 
विज्ञान-तंत्र

जुने फोन, लॅपटॉप विकताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

सकाळ डिजिटल टीम

बरेच लोक त्यांचे जुने स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टॅब विकतात किंवा ईकॉमर्स साइटवर एक्सचेज करुन घेतात. पण जेव्हा आपण एखादे जुने डिव्हाइस विकता तेव्हा काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे असते. बऱ्याचदा आपण जून्या डिव्हाइसमध्ये आपले महत्वाचे फोटो, व्हिडिओ, सोशल मीडिया खाते आणि जीमेल इ. लॉगिन असेल आणि त्यावर बँक संबंधित ओटीपी देखील येत असतील तर अशा वेळी थोडीशी चूक केल्याने आपले मोठे नुकसान होऊ शकते. जुने, लॅपटॉप, स्मार्टफोन आणि टॅबची विक्री करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. 

1 - फोन Factory Reset करा

आजकाल बरेच जण त्यांची कार्यलायीन कामे देखील फोनवर करतात, बँकेशी संबंधित व्यवहार देखील फोनवरच होतात. जर तुम्ही क्लिनअप किंवा फॅक्टरी रीसेट न करता फोनची विक्री केली तर आपली बँकेची माहिती किंवा पासवर्ड दुसऱ्याला कळू शकतो. यापासून बचावासाठी फोनच्या सेटींग्स ​​मध्ये जा आणि त्यामध्ये तुम्हाला फॅक्टरी रीसेटचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा आणि सोबतच फोनमधील सर्व डेटा डिलीट करा. पण त्यापूर्वी हा सर्व डेटा आपल्या नवीन फोनवर ट्रान्सफर करायला विसरु नका.

2 - बॅकअप घ्या

स्मार्टफोन विकण्यापूर्वी तुम्हाला आवश्यक डेटाचा बॅकअप घेणे आवश्यक आहे. आपण हा बॅकअप Google ड्राइव्हवर देखील घेऊ शकता, जेणेकरून जेव्हा आपण आपल्या जीमेल खात्यावर नवीन फोनमध्ये लॉग इन कराल, तो डेटा आपल्याकडे परत येईल. 

3 - लॅपटॉप विक्रीपूर्वी हे नक्की करा

 लॅपटॉप विक्री करण्यापूर्वी तो पुर्णपणे फॉरमॅट करा. कधीकधी काही हॅकर्स काढून टाकलेला डेटा देखील रिकव्हर करतात. अशा परिस्थितीत आपण लॅपटॉप विकण्यापूर्वी, शेयरश्रेडर  सॉफ्टवेअर वापरा, जे आपल्या लॅपटॉपमधील डेटा पूर्णपणे काढून टाकेल. जो पुन्हा रिकव्हर केला जाऊ शकत नाही. 

4 - लॅपटॉप कसा क्लिन कराल

लॅपटॉप क्लिन करण्यासाठी  ब्राउझरमध्ये fileshredder.org  टाइप करा आणि सॉफ्टवेअर फाईल डाउनलोड करा. सॉफ्टवेअर इंस्टॉल केल्यानंतर, एक विंडो उघडेल, ज्यामध्ये  फाइल्स, अ‍ॅड फोल्डर आणि शेअर्ड फ्री डिस्क स्पेस हे तीन पर्याय दिसतील. लॅपटॉपचा डेटा डिलीट केल्यानंतर तुम्हाला शेअर्ड फ्री डिस्क स्पेसचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर हार्ड डिस्कसह इतर ठिकाणी सेव्ह केलेला डेटा पूर्णपणे हटवला जाईल.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: डोंबिवलीत राजकीय पलटवार! भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेश

Julie Yadav: घरी विसरलेला मोबाईल परत आणायला गेली अन्...; भारतीय महिला हॉकी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू, घटनेनं हळहळ

Organ Donation : अवयवदानासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा; रस्ते अपघातांतील मृतांबाबत केंद्र सरकारचे निर्देश देशात, अवयवदानाचे प्रमाण दहा लाखांमागे एक!

फी न दिल्यानं परीक्षेला बसू दिलं नाही, विद्यार्थ्यानं पेटवून घेतलं; प्राचार्य म्हणाले, २५ हजाराचा फोन अन् १ लाखाची गाडी वापरतो

Gujarat Ats : गुजरात एटीएसची मोठी कारवाई: 'रायसिन' विष तयार करणाऱ्या डॉक्टरसह तीन जण अटकेत!

SCROLL FOR NEXT