salman khan 2 crore suv car imported from dubai esakal
विज्ञान-तंत्र

Salman Khan Car : लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खानने खरेदी केली 2 कोटींची कार; SUV चे फीचर्स पाहून व्हाल शॉक

Salman Khan Bulletproof SUV Features : लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमकीनंतर सलमान खानने आपल्या सुरक्षेसाठी दोन कोटींची बुलेटप्रूफ कार आयात केली आहे.

Saisimran Ghashi

Salman Khan Bulletproof SUV Car Features : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीने पुन्हा एकदा जीव घेण्याची धमकी दिल्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमान खानने आपल्या सुरक्षेसाठी दोन कोटींची बुलेटप्रूफ कार आयात केली आहे. सलमानसाठी ही खास कार दुबईमधून आयात करण्यात आली असून, ती भारतीय बाजारपेठेत उपलब्ध नाही.

कारचे खास फीचर्स

ही बुलेटप्रूफ कार अनेक वैशिष्ट्यांनी सज्ज आहे. विशेष प्रकारच्या काचेने तयार केलेल्या या कारमध्ये जवळून गोळी झाडली तरी आतल्या व्यक्तीला काहीही होणार नाही. याशिवाय, या वाहनात स्फोटक ओळखणारी प्रणालीही बसवण्यात आली आहे, जी धोका ओळखून लगेचच इशारा देते. या कारचा रंगही विशेष आहे, त्यामुळे आत कोण बसले आहे, हे ओळखणे अवघड होते.(salman khan bulletproof suv car)

गेल्या वर्षी देखील सलमानने आपल्यासाठी आणि वडिलांसाठी बुलेटप्रूफ कार आयात केली होती. यावेळी मात्र त्याच्यावर वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अधिक सुरक्षिततेची गरज होती. बिग बॉसच्या शुटिंगसाठीही कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत, जिथे सलमान सूत्रसंचालन करत आहे.(salman khan bullet proof car)

बिग बॉसच्या शुटिंगदरम्यान सुमारे ७० सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणी कडक नियम लागू करण्यात आले आहेत, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. शुटिंगच्या ठिकाणी बाहेरील कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमानला ५ कोटी रुपये न दिल्यास, त्यांची जुनी शत्रुता संपवू असा इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर ही धमकी आली, जे सलमानचे खास मित्र होते.

यामुळे सलमानच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली असून, त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारत - पाकिस्तान तिसऱ्यांदा आमने-सामने येणार, फायनलमध्ये महामुकाबला रंगणार! बांगलादेशचे आव्हान संपले

Solapur Flood : टिंगल लावली काय? तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत, पूरग्रस्त शेतकरी थेट मंत्र्यांच्या गाडीसमोरच आडवे पडले

Khedkar Family: अपहरण प्रकरणात खेडकर कुटुंब अडचणीत; फरार दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआऊट नोटीस जारी

Aadul News : सरकट आर्थिक मदत देवून कर्जमाफी करावी; उद्धव ठाकरे

ग्रामविकास मंत्र्यांची मोठी घोषणा! पूरग्रस्तांना सुईसुद्धा विकत घ्यावी लागणार नाही, सरकारकडून मिळेल धान्य, कपडे, दिवाळीचे साहित्य

SCROLL FOR NEXT