Top Smartphone Brand 2024 eSakal
विज्ञान-तंत्र

Top Smartphone Brand : सॅमसंगने केली अ‍ॅपलवर मात! ठरला जगातील सगळ्यात मोठा स्मार्टफोन ब्रँड

Samsung Market Share : जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये सॅमसंगने एकूण 60.1 मिलियन युनिट्सची विक्री केली. या कालावधीमधील कंपनीचा एकूण मार्केट शेअर 20.8 टक्के राहिला.

Sudesh

Samsung Beats Apple : जगातील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड म्हणून अ‍ॅपलची असणारी ओळख सॅमसंगने पुसून काढली आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्परेशन (IDC) ने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, 2024 च्या पहिल्या तिमाहीत सॅमसंगने सर्वाधिक स्मार्टफोनची विक्री केली.

जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये सॅमसंगने एकूण 60.1 मिलियन युनिट्सची विक्री केली. या कालावधीमधील कंपनीचा एकूण मार्केट शेअर 20.8 टक्के राहिला. या तिमाहीमध्ये अ‍ॅपलने 50.1 मिलियन युनिट्सची विक्री केली, आणि त्यांचा मार्केट शेअर 17.3 टक्के राहिला. यानंतर 14.1 टक्के मार्केट शेअरसह श्याओमीने तिसरा क्रमांक पटकावला. तीन महिन्यांमध्ये श्याओमीने सुमारे 40 मिलियन युनिट्सची विक्री नोंदवली आहे.

अ‍ॅपलची मागणी घटली

IDC ने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅपलच्या मागणीमध्ये घट झाल्यामुळे सॅमसंग पुन्हा पहिल्या स्थानी गेलं आहे. अ‍ॅपलने गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये 55.4 मिलियन युनिट्स विकले होते. मात्र यावर्षी त्यामध्ये 10 टक्के घट दिसून आली.

एकूण स्मार्टफोन मागणीत घट

IDC ने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, की 2023 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यावर्षीच्या स्मार्टफोन विक्रीमध्ये 7.8 टक्के घट दिसून आली आहे. या तिमाहीमध्ये एकूण 289.4 मिलियन स्मार्टफोन युनिट्सची विक्री झाली. तरीही कोरोना कालावधीमधील दोन वर्षांच्या तुलनेत हा आकडा अगदीच चांगला आणि आश्वासक असल्याचं मत IDC ग्रुपचे व्हॉइस प्रेसिडेंट रायन रेईथ यांनी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Passes Away: दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन! भारतीय संगीत क्षेत्रातील एक अजरामर आवाज हरपला

Nagpur Crime: नागपूर शहरातील ऑनलाइन बेटिंगची लिंक दुबईपर्यंत; दिल्ली- राजस्थानात मास्टरमाईंड, ५०० रुपयांचा फ्रॉड आता कोट्यवधीपर्यंत!

Breaking News Live Update: जळगाव जिल्ह्यात शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्या शिरला

Vastu Tips : किचनमध्ये नक्की ठेवा 'या' 5 वस्तू; घरी होणार नाही पैशाची कमी, कुटुंबातल्या आरोग्याच्या समस्या होतील दूर, नोकरी-धंद्यात यश

Vidarbha Premier League 2026: विदर्भ प्रीमियर लीगचा थरार १ जूनपासून; नवे नाव, अधिकृत लोगो, शुभंकरचे थाटात अनावरण, यंदा २७ सामने

SCROLL FOR NEXT