Samsung Workers Strike esakal
विज्ञान-तंत्र

Samsung Workers Strike : सॅमसंगच्या कर्मचाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप! 'या' दोन कारणांमुळे युनियन आणि कंपनीमध्ये वाद

Samsung Electronics Union : मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत संप करण्याचा निर्णय कामगारांनी आज जाहीर केला.

सकाळ डिजिटल टीम

Samsung : दक्षिण कोरियातील तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्समधील कामगार संघटनेचे सदस्य सोमवारपासून संपावर आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत संप करण्याचा निर्णय कामगारांनी आज जाहीर केला.

भरीव वेतनवाढ आणि अन्य भत्ते मिळण्यासाठी ‘नॅशनल सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स युनियन’ने (एनएसईयू) मोहीम सुरू केली असून त्याअंतर्गत संपाचे हत्यार उपसले आहे. तीन दिवसांच्या संपाचा आज सांगता होणार होती. त्यात वेळी बेमुदत संपाची हाक संघटनेने दिली. स्मार्टफोन आणि ‘एसआय’ चीप निर्मितीमधील जगातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या ‘सॅमसंग’मधील एकूण कर्मचाऱ्यांपैकी एक चतुर्थांश म्हणजे ३० हजार कर्मचारी कामगार संघटनेचे सदस्य आहेत.

मागण्यांबाबत व्यवस्थापन चर्चा करण्याचे कोणतेही चिन्ह नसल्याने हा औद्योगिक संप बेमुदत सुरू ठेवणार असल्याचे संघटनेने जाहीर केले. ‘‘सोमवारी संप सुरू झाल्यापासून आम्ही व्यवस्थापनाशी बोललेलो नाही,” असे ‘एनएसईयू’चे उपाध्यक्ष ली ह्यून-कुक यांनी सांगितले.

संपामुळे चीप निर्मितीवर परिणाम झाल्याचा दावा कामगार संघटनेने केला असला तरी ‘सॅमसंग’ने सर्व दावे नाकारले आहेत. दक्षिण कोरियातील याआघाडीच्या कंपनीच्या उत्पादनावर कोणताही परिणाम झाला नाही. ‘‘सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन विभागात कोणतेही अडथळे येणार नाही, याची काळजी घेतली घेण्यात येईल. कामगार संघटनेबरोबर सद्‍भावनेने वाटाघाटी करण्यासाठी वचनबद्ध आहे,’’ असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या

- मूळ वेतनात ३.५ टक्के वाढ

- संघटनेच्या युनियनच्या स्थापनादिनी सुट्टी

ली ह्यून-कुक म्हणाले

- व्यवस्थापनाने पूर्वी मूळ वेतनात तीन टक्के वाढ देऊ केली होती

- महागाई वाढल्याने वेतन ०.५ टक्क्याने आणखी वाढविण्याची संघटनेची मागणी

- साडेसहा हजार कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग

- जास्तीतजास्त कर्मचाऱ्यांनी संपात भाग घ्यावा, यासाठी युनियन अधिक सहभागी होण्यासाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन

- संपामुळे काम मंदावले असल्याने काही ठिकाणच्या चीप निर्मितीवर परिणाम

- आमच्या विजयाची पूर्ण खात्री आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Pune News: पुणेकरांना गुंठेवारीत दिलासा नाही! मुदतवाढ मिळाली, पण शुल्कात कपात नाही; जुन्याच दराने नियमितीकरण

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT