Samsung Galaxy A06 Budget Smartphone esakal
विज्ञान-तंत्र

Samsung Budget Phone Launch : सॅमसंगचा स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच; एकदा चार्जिंग केलं की दिवासभराच टेंशन मिटलं, अजून काय आहे खास?

Samsung Galaxy A06 Budget Smartphone Launch : सॅमसंगने नुकताच नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने Galaxy A06 व्हिएतनाममध्ये लाँच केला आहे. या फोनची किंमत 10000 रुपयांपासून सुरू आहे.

Saisimran Ghashi

Samsung Galaxy A06 Smartphone : लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने नुकताच नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने Galaxy A06 व्हिएतनाममध्ये लाँच केला आहे. ही बातमी भारतीयांसाठी खास आहे कारण कंपनीने अजून भारतात लाँचची घोषणा केलेली नसली तरीही A06 च्या फीचर्स आणि किंमतीमुळे भारतातच्या स्मार्टफोन धमाका होण्याची शक्यता आहे.

आकर्षक डिस्प्ले- या फोनमध्ये 6.7 इंचाचा मोठा HD+ डिस्प्ले आहे जो 60Hz रिफ्रेश रेट देतो. खास आकर्षण म्हणजे पाण्याच्या थेंबाच्या आकारातील नोचमध्ये बसवलेला फ्रंट कॅमेरा. कामगिरीसाठी octa-core MediaTek Helio G85 चिपसेट आणि 4GB ते 6GB रॅमचा पर्याय आहे. स्टोरेजबाबत 64GB ते 128GB पर्याय उपलब्ध असून microSD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येतो.

50 मेगापिक्सल कॅमेरा- फोटोग्राफीसाठी Galaxy A06 मध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर असलेली ड्यूल रियर कॅमेरा सिस्टीम देतो. त्यामुळे चांगल्या दर्जाचे फोटो आणि व्हिडिओ काढणे शक्य आहे.

5000mAh ची बॅटरी - सर्वांत आकर्षक म्हणजे 5000mAh ची बॅटरी आहे जी तुमच्या दिवसभराचा वापर सहज चालेल. 25W फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे बॅटरी लवकर चार्ज होईल याचीही खात्री आहे.

नवीनतम सॉफ्टवेअर - A06 Android 14 सह येतोय. यासोबतच पुढील दोन Android अपग्रेड्स आणि चार वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळणार आहेत.

स्टोरेज आणि प्रोसेसर - तुमच्या आवडीनिवडीन्या अॅप्स, गाणी आणि फायलसाठी 128GB पर्यंतचा स्टोरेज आणि दमदार Helio G85 प्रोसेसर उपलब्ध आहे.

अतिरिक्त वैशिष्ट्ये - बाजूला असलेला फिंगरप्रिंट सेन्सर, 25W फास्ट चार्जिंग आणि सॅमसंग Knox Vault सिक्योरिटी सिस्टीम या फोनची आणखी काही खास वैशिष्ट्ये आहेत.

किंमत आणि उपलब्धता

व्हिएतनाममध्ये Samsung Galaxy A06 ची किंमत 4GB रॅम + 64GB स्टोरेज वरियंटसाठी VND 3,190,000 (रु. 10,700) आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज वरियंटसाठी VND 3,790,000 (रु. 12,700) आहे. हा फोन 22 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

भारतात लाँच कधी?

सध्या कंपनीने भारतात लाँचबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण या फोनची दमदार वैशिष्ट्ये पाहता भारतातही लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT