Samsung, Samsung GalaxyM02, Galaxy M01 
विज्ञान-तंत्र

सॅमसंग आणतंय स्वस्तातले फोन; 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स

सकाळ ऑनलाईन टीम

 दक्षिण कोरियाची स्मार्टफोन निर्माण करणारी कंपनी नव्या वर्षातील नवे डिझाईन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. पुढच्या आठवड्यात सॅमसंगचा माफक दरातील स्मार्टफोन Samsung Galaxy M02s बाजारात येणार आहे. या नव्या स्मार्टफोनची किंमत 10 हजारपेक्षाही कमी असल्याचे बोलले जात आहे. कंपनीने अधिकृतरित्या अद्याप किंमतीसंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. पण स्मार्टफोनमध्ये काय फिचर्स असतील याची माहिती समोर आली आहे. 

काय असतील या स्मार्टफोनची फिचर्स 

IANS ने सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, गॅलेक्सी M02s स्मार्टफोन 6.5 इंच डिस्प्ले आणि  5000mAh  बॅटरीसह उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यात 3 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज या दोन प्रकारात हा स्मार्टफोन उपलब्ध होतील.  2021 मध्ये बाजारात येणाऱ्या या स्मार्टफोनसोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.  

10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमती 4 जीबी रॅमसह मिळणारा सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.  सॅमसंग गॅलेक्सी M02s ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि देशभरातील रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येईल. गॅलेक्सी M सॅमसंगची लोकप्रिय सीरीज आहे. त्यामुळेच मागील वर्षी तिसऱ्या तिमाहीत सॅमसंग भारतातील स्मार्टफोनची आघाडीची कंपनी राहिली होती.  

नुकतेच कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी M01s स्मार्टफोनच्या किंमती 500 रुपयांनी कपात केल्या होत्या. आता हे स्मार्टफोन 8,999 रुपयांना उपलब्ध आहेत. 6.2 इंच इनफिनिटी-व्ही डिस्प्ले, 13.0 MP + 2.0 MP चा ड्युअल रियर कॅमेरा, 3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज, मीडियाटेक हीलिओ MT6762 प्रोसेसर, आण 4000mAh क्षमतेची बॅटरी मिळते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tarique Rahman: तारिक रहमान भारत दौऱ्यावर येतील पण...; बांगलादेशने ठेवली फक्त एकच अट, पण कोणती? समीकरण बिघडणार

Hockey World Cup: दोनदा आघाडी, पण तरी अखेर चीनविरुद्ध भारताची बरोबरी! पहिल्याच सामन्यात रंगला थरार

Aadhaar Centres Only on Paper: मुळशीतील आधार सेवा केंद्रे केवळ कागदावर; २० पैकी ७ केंद्रे मंजूर ठिकाणीच नाहीत, काहींचा ठाव ठिकाणा प्रशासनालाच नाही

Marathi News Live Updates : रायगडमध्ये पावसाळी पर्यटनाला गेलेला तरुण काळ नदीत बेपत्ता

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे दीडशतक अन् भारताच्या साडेचारशे धावा पार; पण दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा जोरदार पलटवार

SCROLL FOR NEXT