Samsung Smartphone Sakal
विज्ञान-तंत्र

Samsung Smartphone: एकच नंबर! सॅमसंगचा नवाकोरा फोन अवघ्या ८,४९९ रुपयात, फीचर्स एकापेक्षा एक जबरदस्त

गेल्या आठवड्यात लाँच झालेल्या Samsung Galaxy M04 स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरू झाली आहे. या फोनची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Samsung Galaxy M04 Sale Starts: गेल्या आठवड्यात लाँच झालेल्या Samsung Galaxy M04 स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरू झाली आहे. सॅमसंगच्या या एंट्री लेव्हल स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएचची दमदार बॅटरी, ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आणि ४ जीबी व्हर्च्यूअल रॅम सारखे फीचर्स मिळतील. Samsung Galaxy M04 च्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Samsung Galaxy M04 ची किंमत

Samsung Galaxy M04 स्मार्टफोनची किंमत ८,४९९ रुपये आहे. फोनला ब्लॅक आणि ग्रीन रंगात खरेदी करू शकता. सॅमसंगचा हा हँडसेट १६ डिसेंबरपासून सॅमसंग इंडिया आणि अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे एसबीआय बँक कार्डचा वापर केल्यास १ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंटचा फायदा मिळेल.

Samsung Galaxy M04 चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M04 मध्ये ६.५ इंच PLS LCD डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. फोन अँड्राइड १२ ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित OneUI वर काम करतो. यात ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यामध्ये १३ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसरचा समावेश आहे. रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह येतो. यात सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

सॅमसंगच्या या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. विशेष म्हणजे फोनच्या रॅमला ४ जीबीपर्यंत वाढवू देखील शकता. तसेच, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेजला देखील वाढवू शकता. तसेच, कंपनी फोनसाठी २ वर्ष ओएस अपडेट जारी करेल. मीडियाटेक हीलियो P35 CPU सह येतो.

हँडसेटमध्ये पॉवर बॅकअपसाठी १० वॉट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. यात ड्यूल सिम, 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ३.५ एमएम ऑडिओ जॅक सारखे फीचर्स देखील मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT