Galaxy S23 Mobile Discount Offer : प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन घ्यायचा विचार करत आहात, पण बजेट कमी आहे? तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. फ्लिपकार्टवर सध्या Samsung Galaxy S23 256GB मॉडेलवर जबरदस्त सूट मिळत आहे. तब्बल 50,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह, हा फोन आता जवळपास निम्म्या किमतीत खरेदी करता येणार आहे.
Samsung Galaxy S23 256GB ची मूळ किंमत 95,999 रुपये होती. मात्र, सध्या फ्लिपकार्टवर हा फोन अवघ्या 41,999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. म्हणजेच, 56% सूट मिळत आहे. हा स्मार्टफोन फ्लॅगशिप-लेव्हल परफॉर्मन्स, दमदार कॅमेरा आणि आकर्षक डिझाइनसह अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध झाला आहे.
फ्लिपकार्टवर या डीलमध्ये अतिरिक्त बँक आणि एक्सचेंज ऑफर्स देखील आहेत.
बँक ऑफर- Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5% कॅशबॅक, तसेच IDFC बँक कार्डवर 750 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळते.
एक्सचेंज ऑफर- तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास 39,150 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. जर तुम्हाला फक्त 15,000 रुपयांची एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली, तरी तुम्ही Samsung Galaxy S23 256GB अवघ्या 26,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
डिझाइन-
एल्यूमिनियम फ्रेम आणि IP68 वॉटर व डस्ट रेझिस्टन्स, प्रीमियम लुक.
डिस्प्ले-
6.1-इंच Dynamic AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ सपोर्ट, 1750 निट्स पीक ब्राइटनेस.
परफॉर्मन्स-
दमदार Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, स्मूथ मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी उत्तम.
स्टोरेज आणि रॅम-
8GB RAM आणि 256GB स्टोरेज, ज्यामुळे वेगवान आणि चांगला परफॉर्मन्स मिळतो.
कॅमेरा-
50MP (मुख्य) + 10MP (टेलीफोटो) + 12MP (अल्ट्रा-वाइड) ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, तसेच 12MP फ्रंट कॅमेरा.
बॅटरी आणि चार्जिंग-
3900mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट, जास्त काळ टिकणारी बॅटरी.
सॉफ्टवेअर-
Android 13 वरील Samsung One UI
जर तुम्ही फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही सुवर्णसंधी गमावू नका. Flipkart वर उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घ्या आणि Samsung Galaxy S23 256GB एकदम कमी दरात खरेदी करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.