Samsung Galaxy S24 discount offer sakal
विज्ञान-तंत्र

Samsung Discount : Samsung Galaxy प्रीमियम 5G मोबाईलवर मिळतोय चक्क 21 हजारांचा डिस्काउंट; जबरदस्त ऑफर पाहा एका क्लिकवर

Samsung Galaxy S24 मोबाईलच्या किंमतीवर तब्बल 21,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

Saisimran Ghashi

Samsung Galaxy S24 Discount : सॅमसंगने आपल्या मागील वर्षीच्या Galaxy S24 स्मार्टफोनच्या किमतींमध्ये मोठी सूट दिली आहे. कंपनीने आपला नवीन Galaxy S25 लॉन्च केल्यानंतर, S24 च्या किमतीत अधिकृतरित्या 10 हजार रुपयाची घट केली आहे. मात्र, Amazon आणि इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हा फोन तब्बल 21,000 रुपये स्वस्त मिळत आहे. त्यामुळे, प्रीमियम स्मार्टफोन स्वस्तात घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Galaxy S24 किती स्वस्त?

Samsung च्या अधिकृत संकेतस्थळावर आणि स्टोअरमध्ये Galaxy S24 च्या किमतीत 10 हजारपर्यंत सूट देण्यात आली आहे.

8GB RAM + 128GB स्टोरेज: ₹74,999 वरून ₹64,999

8GB RAM + 256GB स्टोरेज: ₹79,999 वरून ₹70,999

8GB RAM + 512GB स्टोरेज: ₹89,999 वरून ₹82,999

तब्बल 21 हजारांचा डिस्काउंट

जर तुम्ही Amazon वरून Galaxy S24 खरेदी करत असाल, तर हा फोन तुम्हाला ₹53,999 मध्ये मिळू शकतो, जो कंपनीच्या अधिकृत किंमतीपेक्षा तब्बल ₹11,000 स्वस्त आहे. सर्व ऑफर्स मिळून ही किंमत ₹21,000 पर्यंत कमी होऊ शकते. विशेष म्हणजे, ही सूट बँक ऑफर्स किंवा एक्सचेंज डीलशिवाय उपलब्ध आहे.

Galaxy S24 घ्यावा की Galaxy S25?

नवीन Galaxy S25 मध्ये काही मोठे अपग्रेड्स मिळतात, जसे की Snapdragon 8 Gen 3 Elite प्रोसेसर आणि सुधारित Galaxy AI फिचर्स, पण यातील बरीच वैशिष्ट्ये सॉफ्टवेअर अपडेटद्वारे Galaxy S24 मध्येही मिळणार आहेत. त्यामुळे, नवीन S25 साठी मोठी रक्कम खर्च करण्यापेक्षा S24 स्वस्तात घेणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

Galaxy S25 किती महाग आहे?

Galaxy S25 (12GB RAM + 256GB स्टोरेज): ₹80,999

Galaxy S25 (512GB स्टोरेज): ₹92,999

Galaxy S25 Ultra (1TB स्टोरेज): ₹1,65,999

जर तुम्हाला प्रीमियम Samsung स्मार्टफोन घ्यायचा असेल, पण जास्त खर्च टाळायचा असेल, तर Galaxy S24 हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. कमी किमतीत प्रीमियम फिचर्स हवे असतील, तर ही संधी सोडू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT