Galaxy S24 India Price eSakal
विज्ञान-तंत्र

Samsung S24 India Price : सॅमसंगच्या गॅलेक्सी S24 सीरीजची भारतात किती आहे किंमत? अखेर झालं स्पष्ट

Samsung Galaxy S24 : या सीरीजमध्ये Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra हे तीन फोन लाँच करण्यात आले आहेत.

Sudesh

Samsung Galaxy S24 Series Price in India : सॅमसंगने बुधवारी रात्री आपली नवी स्मार्टफोन सीरीज लाँच केली. गॅलेक्सी अनपॅक्ड 2024 या इव्हेंटमध्ये Samsung Galaxy S24 ही सीरीज लाँच करण्यात आली आहे. यावेळी कंपनीने भारतातील किंमती जाहीर केल्या नव्हत्या, मात्र आता याबाबत माहिती देण्यात आली आहे.

या सीरीजमध्ये Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra हे तीन फोन लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये गॅलेक्सी एआयचे भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. तसंच यातील अल्ट्रा मॉडेलमध्ये तब्बल 200MP क्षमतेचा कॅमेरा दिला आहे. (Samsung Galaxy S24 Series price in India)

भारतात किती असणार किंमत

भारतात गॅलेक्सी S24 या स्मार्टफोनच्या 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 79,999 रुपये आहे. तर 8GB+512GB व्हेरियंटची किंमत 89,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँबर येलो, कोबाल्ट व्हायलट, ऑनिक्स ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. (Price of 8GB+256GB variant of Galaxy S24 smartphone)

Samsung Galaxy S24 Plus स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरियंटची किंमत 99,999 रुपये आहे. 12GB+512GB व्हेरियंटची किंमत 1,09,999 रुपये आहे. या फोनला कोबाल्ट व्हायलट, ऑनिक्स ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये लाँच करण्यात आलं आहे. (12GB+256GB variant of Samsung Galaxy S24 Plus smartphone)

गॅलेक्सी S24 अल्ट्रा या स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरियंटची किंमत 1,29,999 रुपये आहे. 12GB+512GB व्हेरियंटची किंमत 1,39,999 रुपये असणार आहे. तर 12GB+1TB व्हेरियंटची किंमत 1,59,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. (12GB+256GB variant of Galaxy S24 Ultra smartphone)

या स्मार्टफोनची प्री-बुकिंग सुरू झाली आहे. या सीरीजच्या प्री-बुकिंगवर ग्राहकांना निश्चित भेटवस्तू देण्यात येणार आहेत. यामुळे हजारो रुपयांचा फायदा होणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. (Customers will be given a fixed gift on pre-booking this series)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction on Trump tariff: ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर फोडलेल्या टॅरिफ बॉम्बनंतर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका!

Jaya Bachchan warn Priyanka Chaturvedi: जया बच्चन राज्यसभेत बोलताना अचानक शेजारीच बसलेल्या प्रियंका चतुर्वेदींवर उखडल्या, म्हणाल्या...

Trumps Tariff Bomb: ट्रम्प 'टॅरिफ'मुळे भारताच्या टेक्सटाईल्स, फार्मासह 'या' ५ उद्योगांना बसणार फटका, पाहा संपूर्ण लिस्ट

Amit Shah Rajya Sabha Speech: ‘माझ्याशी तर निपटा, पंतप्रधानांना कशाला बोलावताय, आणखी त्रास होईल’’

Prakash Solanke: प्रकाश सोळंकेंनी गळाला लावलेले बाबरी मुंडे नेमके कोण? पंकजांसह धनंजय मुंडेंना जबरदस्त धक्का!

SCROLL FOR NEXT