samsung galaxy z flip 4 and galaxy z fold 4 pre booking starts in india on august 16 check offers here  
विज्ञान-तंत्र

Samsung Galaxy Z Fold 4 : भारतात 16 तारखेपासून प्री-बुकिंग, पाहा ऑफर

सकाळ डिजिटल टीम

सॅमसंगने भारतात नुकतेच दोन फोल्डेबल फोन लॉंच केले आहेत. हे स्मार्टफोन Samsung Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4 चे प्री-बुकिंग जाहीर केले आहे. या दोन्ही फोन प्री-बुकिंग 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. दोन्ही फोन सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध करून दिले जातील. हे दोन्ही फोन सॅमसंगने 10 ऑगस्ट रोजी गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये जागतिक स्तरावर लॉन्च केले आहेत.

प्री-बुकिंगवर उपलब्ध ऑफर

सॅमसंगच्या या दोन फ्लॅगशिप्स फोन बुकिंगवर ग्राहकांना ऑफर दिल्या जात आहे. प्री बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 40,000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळतील. याशिवाय प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 5,199 रुपयांची विशेष भेट मिळेल असे कंपनीने म्हटले आहे. Galaxy Z Flip 4 Bespoke Edition वर ग्राहकांना 2,000 रुपयांचे स्लिम कव्हर मोफत मिळेल. प्री-बुकिंग 17 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत चालेल.

तुम्हाला Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर Samsung Galaxy Z Flip 4 आणि Samsung Galaxy Z Fold 4 या दोन्ही फोनमध्ये देण्यात आला आहे. तसेच Samsung Galaxy Z Flip 4 ची किंमत $999 म्हणजेच सुमारे 79,000 रुपयांपासून सुरु होत आहे. हा फोन ब्लू, बोरा पर्पल, ग्रेफाइट आणि पिंक गोल्ड कलरमध्ये उपलब्ध असेल. त्याच वेळी, Samsung Galaxy Z Fold 4 ची किंमत $1,799.99 म्हणजेच सुमारे 1,42,700 रुपयांपासून सुरू होते. हा फोन बेज, ग्रे-ग्रीन आणि फँटम ब्लॅक रंगात उपलब्ध असेल. सॅमसंगने अद्याप दोन्ही फोनच्या भारतात किंमती किती असतील ते अद्याप जाहीर केलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT