samsung galaxy z fold 4 flip 4 open for pre booking check features and specifications  
विज्ञान-तंत्र

सॅमसंग गॅलक्सी Z Fold 4 अन् Flip 4 ची प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

सॅमसंगच्या गॅलेक्सी झेड सीरिजच्या लॉन्चची तारीख कन्फर्म झाली आहे. सॅमसंग 10 ऑगस्ट रोजी आपली प्रीमियम फोन सीरीज लॉन्च करणार आहे. सॅमसंगचे फोल्डेबल फोन Samsung Galaxy Z Fold 4 आणि Samsung Galaxy Z Flip 4 या इव्हेंटमध्ये लॉन्च केले जातील. कंपनीने या फोनच्या प्री-बुकिंगबाबत अधिकृत घोषणाही केली आहे. तुम्ही हे फोन 31 जुलैपासून म्हणजे आजपासूनच प्री-बुक करू शकता. चला जाणून घेऊया या सॅमसंग प्री-बुकिंग ऑफर , इव्हेंट आणि या फोन्सबद्दल.

ऑफर काय आहे?

Samsung 10 ऑगस्ट रोजी आपले प्रीमियम फोन Samsung Galaxy Z Fold 4 आणि Samsung Galaxy Z Flip 4 लॉन्च करणार आहे. कंपनीचा लॉन्च इव्हेंट 10 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होईल. सॅमसंगमध्ये या फोनच्या प्री-बुकिंगची माहिती लाइव्ह करताना, 31 जुलैपासून सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवरून 1,999 रुपयांच्या टोकन रकमेसह प्री-बुकिंग करता येईल. जर वापरकर्ते 1,999 रुपयांच्या टोकन रकमेसह प्री-बुक करतील त्यांना फोन खरेदी केल्यावर सॅमसंगकडून 5,000 रुपयांचे जास्तीचे बेनिफिट्स देखील देण्यात येणार आहेत.

Samsung Galaxy Z Fold 4 आणि Flip 4 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

हा सॅमसंग फोन प्रीमियम डिझाइन आणि पावरफुल फीचर्ससह येणार आहे. हे फोन लेटेस्ट Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, हे फोन मल्टिपल कलर व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले जातील, यामध्ये इन-डिस्प्ले फ्रंट कॅमेरा देखील मिळू शकतो. तसेच सॅमसंग फोल्डिंग डिस्प्लेची फ्रेम देखील बदलू शकते. या फोनमध्ये सॅमसंग एस-पेन देखील सपोर्ट केला जाऊ शकतो अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

Kanker IED Blast: छत्तीसगडमध्ये मोठा आयईडी स्फोट! ३ जवान शहीद तर १ जखमी, कशी घडली घटना?

14 व्या वर्षी लग्न, सासरी सहन केला नाहक त्रास, 450 सिनेमांमध्ये काम करुनही झाला दुर्देवी अंत, कोण होती अभिनेत्री?

Gulabjam City: जिभेवर ठेवताच विरघळणारा 'शाही' गोडवा! 'या' शहराला म्हणतात 'गुलाबजामची राजधानी'; ८५ वर्षांपासून जपलीये चव!

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या प्रकरणावर सुप्रिया सुळे संतप्त; ‘फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षा हवी’

SCROLL FOR NEXT