Samsung AI Gauss eSakal
विज्ञान-तंत्र

Samsung AI Gauss : एआयच्या शर्यतीत आता सॅमसंगचीही उडी, लाँच केलं स्वतःचं खास टूल!

Samsung AI tool : प्रसिद्ध गणिततज्ज्ञ कार्ल फ्रेडरिक गॉस यांच्या नावावरुन या एआय टूलचं नाव ठेवण्यात आलं आहे.

Sudesh

Samsung AI : जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, म्हणजेच एआयचा वापर सुरू झाला आहे. यामुळेच दिग्गज टेक जायंट कंपन्या स्वतःचं एआय टूल विकसित करत आहेत. कोरियन टेक कंपनी सॅमसंगने देखील स्वतःचं जेनरेटिव्ह एआय टूल विकसित केलं आहे. Gauss AI असं नाव कंपनीने या एआयला दिलं आहे.

प्रसिद्ध गणिततज्ज्ञ कार्ल फ्रेडरिक गॉस यांच्या नावावरुन या एआय टूलचं नाव ठेवण्यात आलं आहे. गॉस यांनी नॉर्मल डिस्ट्रिब्युशन थिअरीमध्ये आपलं योगदान दिलं होतं. सॅमसंगने सध्या हे टूल केवळ आपल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलं आहे. सिओलमध्ये झालेल्या वार्षिक सॅमसंग एआय फोरममध्ये याची घोषणा करण्यात आली.

सॅमसंगच्या रिसर्च विंगने या टूलची निर्मिती केली आहे. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी यासाठी या टूलचा वापर केला जातो आहे. भविष्यात कंपनीच्या प्रॉडक्ट फंक्शनॅलिटीसाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. गॉस एआयमध्ये गॉस लँग्वेज, गॉस कोड आणि गॉस इमेज अशा तीन गोष्टी आहेत.

सॅमसंग गॉस लँग्वेज हे ई-मेल, समरी आणि ट्रान्सलेशन अशा गोष्टींसाठी मदत करणार आहे. यासोबतच यामध्ये स्मार्ट डिव्हाईसेसना कंट्रोल करण्याची क्षमता आहे. हे मॉडेल क्लाऊड बेस्ड आणि ऑन-डिव्हाईस अशा दोन्ही प्रकारे काम करते. (Tech News)

सॅमसंग गॉस कोड हे एआय टूल कंपनीसाठी कोडिंगचं काम करते. यामुळे कमी वेळेत अधिक चांगले सॉफ्टवेअर तयार केले जाऊ शकतात. तर सॅमसंग गॉस इमेज हे एक फोटो जनरेटिंग आणि एडिटिंग टूल आहे. स्टाईल बदलणे आणि कमी रिझॉल्यूशनचे फोटो हाय क्वालिटीमध्ये बदलणे अशी कामं यामध्ये होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT