Samsung Laptop eSakal
विज्ञान-तंत्र

Samsung Laptop : आता सॅमसंग बनवणार 'मेड इन इंडिया' लॅपटॉप; नोएडातील फॅक्टरीमध्ये होणार निर्मिती - रिपोर्ट

Make in India : मेक इन इंडिया मोहिमेमुळे आता जगभरात मेड इन इंडिया उत्पादनांची मागणी वाढत आहे.

Sudesh

जगभरातील कित्येक मोठ्या कंपन्या आता भारतात आपली उत्पादनं तयार करत आहेत. मेक इन इंडिया मोहिमेमुळे आता जगभरात मेड इन इंडिया उत्पादनांची मागणी वाढत आहे. अ‍ॅपलने नवीन आयफोन 15 सीरीजमधील फोन भारतात असेम्बल केले होते. आता सॅमसंगने देखील आपले लॅपटॉप भारतात तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

सॅमसंगच्या नोएडाच्या फॅक्टरीमध्ये हे लॅपटॉप तयार केले जाणार आहेत. आतापर्यंत या फॅक्टरीमध्ये स्मार्टफोन तयार केले जात होते. आता यामध्ये लॅपटॉपही बनवले जातील. मिंट या वेबसाईटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यासाठी सुमारे 100 ते 200 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आल्याचं मिंटच्या सूत्रांनी सांगितलं.

इकॉनॉमिक टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे, की जगभरातील कित्येक कंपन्या भारतात उत्पादन करण्यासाठी आतुर आहेत. यासाठी कंपन्यांनी भारतात आधीपासून असलेल्या कंपन्यांसोबत टाय-अप करण्यास सुरुवात केली आहे.

Asus कंपनी ही अमेरिका स्थित फ्लेक्स्ट्रॉनिक्स कंपनीसोबत कोलॅबरेट करत आहे. या अमेरिकन कंपनीने रिव्हाईज्ड प्रॉडक्शन-लिंक्ड इन्सेन्टिव्ह (PLI) योजनेसाठी अर्ज केला आहे. ही कंपनी सध्या HP ची उत्पादने तयार करते.

याप्रमाणेच तैवानमधील कंपनी Acer देखील आता भारतात आपले लॅपटॉप तयार करण्याच्या विचारात आहे. HP आणि Lenovo देखील डिक्सन कंपनीशी चर्चा करत आहेत. या दोन्ही कंपन्या आधीपासून भारतात उत्पादन घेत असूनही त्यांनी नवीन करारासाठी तयारी केली आहे.

टेक क्षेत्रात सुधारित PLI स्कीमला मंजूरी दिल्यानंतर, कंपन्यांची भारतात येण्यासाठीची लगबग सुरू झाली आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी परदेशातून येणाऱ्या लॅपटॉप आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक्स सामानाच्या आयातीवर निर्बंध लागू होते. त्यामुळे देखील ही वाढ दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

Nagpur Rural Development: ७९ वर्षांनंतरही स्वातंत्र्य आहे कुठे?; स्वातंत्र्याच्या अमृतकाळानंतरही मूलभूत सुविधांची ग्रामस्थांना प्रतीक्षा

IND vs SL 1st Test: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताची प्रथम फलंदाजी, श्रीलंकेसमोर मोठं आव्हान उभं करण्याचा इरादा

Gen Z साठी मोदींच्या मोठ्या घोषणा; कोचिंग क्लास फ्री ते १ लाख कोटींचा इनोव्हेशन फंड, ५ मोठ्या घोषणा!

Independence Day Live Update : आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू, स्वातंत्र्यदिन कार्यालयातच साजरा

SCROLL FOR NEXT