Satara Latest Marathi News 
विज्ञान-तंत्र

Good News! आता लहान मुलांनाही मिळणार Instagram; इन्स्टाच्या प्रमुखांनी का घेतला निर्णय?, वाचून व्हाल आवाक्

Balkrishna Madhale

सातारा : फेसबुकचे अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) आता मुलांसाठी नवीन अ‍ॅप आणत आहे. आधीपासूनच आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या इन्स्टाग्राममध्ये हे नवीन व्हर्जन दिसणार आहे. हे अ‍ॅप 13 वर्षाखालील मुलांसाठी असेल, असा खुलासा इन्स्टाग्राम प्रॉडक्टचे उपाध्यक्ष विशाल शाह यांनी बझफिडला (BuzzFeed) दिलेल्या मुलाखतीत केला आहे. शहा यांच्या म्हणण्यानुसार, इन्स्टाग्रामवर दोन व्हर्जन असतील. एक व्हर्जन 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी, तर आणखी एक व्हर्जन 13 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तरुणांसाठी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लहान मुलांसाठीही येणार Instagram

सध्या 13 वर्षाखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्याची कोणतीही परवानगी ​​नाही. त्यामुळे मुले त्यांचे पालक किंवा व्यवस्थापकाच्या देखरेखीखाली इन्स्टाग्राम वापरू शकतात. BuzzFeed च्या अहवालानुसार, मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या इंस्टाग्राम व्हर्जनचे काम इन्स्टाग्रामचे प्रमुख अ‍ॅडम मोसेरी (Adam Mosseri) हे पाहणार आहेत. मात्र, या व्हर्जनचे नेतृत्व फेसबुकचे उपाध्यक्ष पवनी दिवाणजी (Pavni Diwanji) करणार आहेत. ज्यांनी यापूर्वी यूट्यूब किड्सचे नेतृत्व केले आहे. तसेच, इन्स्टाग्रामवर पॅरेंटल कंट्रोल देण्याचीही तयारी सुरू असल्याचे इन्स्टाच्या प्रमुखांनी सांगितले.

मुलांसाठी स्वतंत्र Instagram आणण्याचे कारण काय?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलांवरील गुन्हेगारीत वाढ होत असून याचा परिणाम मुलांकडून आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होत असल्याचा आरोप होत आहे. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलांविरूद्ध सामग्री (हक्क) काढण्याचा दबाव देखील वाढत आहे. यूके बेस्ट नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएलिटी टू चिल्ड्रेनच्या मतानुसार, इन्स्टाग्रामवर मुलांसंदर्भात सर्वात जास्त प्रकरण आढळली आहेत. गेल्या तीन वर्षांत त्यात लक्षणीय वाढ झाली असून अशा परिस्थितीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी स्वतंत्र अ‍ॅप्स तयार करण्याचा दबाव वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT