Satellite phone
Satellite phone esakal
विज्ञान-तंत्र

'पठान'मध्ये दिसलेला हा फोन कितीचा माहितीये? सामान्यांच्या तर आवाक्या बाहेर

सकाळ डिजिटल टीम

Satellight Phone in Pathan : सॅटलाइट फोन आजवर तुम्ही अनेक सिनेमांमध्ये बघितला असेल. अगदी अलिकडचा विचार करायचा तर सध्या ब्लॉकब्लस्टर हिट ठरलेला पठाण सिनेमातही हा फोन बघायला मिळाला आहे. सुरुवातीच्या काही सीन्समध्ये हा फोन बघायला मिळतो.

हा सॅटेलाइट फोन काय असतो? आणि सीम कार्ड नेटवर्कशिवाय हा कसा काम करतो. जाणून घ्या त्याविषयीचे डिटेल्स.

फिचर्स

याच्या नावातूनच समजते की, या फोनचा तसा तर मोबाइल नेटवर्कशी काहीही संबंध नाही. अवकाशात फिरणाऱ्या उपग्रहांच्या मार्फत याला सिग्नल मिळतात. सॅटेलाइटविषयी तुम्हाला माहितच आहे की, हे पृथ्वीच्या कक्षेत राहून पृथ्वीभोवती फिरत असतात. आणि जमीनीवरच्या रिसिव्हरला रेडिओ सिग्नल पाठवत असतात.

या रिसिव्हरचाच वापर या सॅटेलाइट फोनमध्ये होत असतो. सॅटेलाइट फोनचा सिग्नल पहिला सॅटेलाइटपर्यंत जातो. मग तिथून तो सिग्नल रिसिव्हरला सॅटेलाइट पाठवतो. त्यामुळे हा फोन दुर्गम भागाताही काम करू शकतो.

हा फोन सामान्य लोकांच्या वापरासाठी नसतो. सुरक्षेच्या कारणामुळे भारतात सामान्य लोकांना साटेलाइट फोन वापरण्यावर बंदी आहे. अतिआवश्यक स्थितीत याच्या वापरासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते.

भारतात BSNL पण सॅटेलाइट सेवा उपलब्ध करुन देतं. पोलीस, लष्कर, रेल्वे, बीएसएफ आणि इतर सरकारी एजंसीज याचा गरजेच्या वेळी वापर करतात. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन एजंसीपण याचा वापर करु शकते.

किंमत

सॅटेलाइट फोन्सची किंमत १५०० ते २००० डॉलर्सच्या जवळपास असते. भारतात याची किंमत १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते. याचे कॉल रेट इतर फोन कॉलपेक्षा महाग असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT