Sunita Williams Stuck in Space esakal
विज्ञान-तंत्र

Sunita Willimas Space : अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्मम्ससमोर आलं आणखी एक मोठं संकट, नासाने अलर्ट केलं नसतं तर...

Sunita Williams Trapped : अंतराळातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) 5 जूनपासून असणाऱ्या आणि पृथ्वीवर परती होत नसल्याने अडकलेल्या अंतराळवीरांसाठी काल एक थरारक क्षण आला.

Saisimran Ghashi

NASA : अंतराळातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून (ISS) पृथ्वीवर परती होत नसल्याने अडकलेल्या नासाच्या अंतराळवीरांसाठी काल एक थरारक क्षण आला. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था NASAच्या सुचनेनुसार बुधवारी रात्री एका तुटलेल्या उपग्रहामुळे अवकाश कचऱ्याचा धोका निर्माण झाला. यामुळे अंतराळात असणाऱ्या असलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना तात्काळ संरक्षण कक्षेत (Starliner spacecraft) जाण्याचे आदेश देण्यात आले.

हेल्मेटच्या आकाराच्या या संरक्षण कक्षेत अंतराळवीरांनी जवळपास एक तास घालवला. अवकाश कचऱ्याची दिशा आणि वेग यांची माहिती मिळाल्यानंतर धोका टळल्याचे स्पष्ट झाल्यावर अंतराळवीरांना पुन्हा स्थानकात परतण्यास परवानगी देण्यात आली.

या घटनेमुळे अंतराळातील कचऱ्याच्या वाढत्या समस्या आणि अंतराळ मोहिमांमध्ये सुरक्षा नियमावलींचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्याचबरोबर, बोइंगच्या स्टारलाइनर या अंतराळयानाचीही क्षमता या घटनेमुळे समोर आली आहे. अंतराळ स्थानकात येऊन येणाऱ्या अंतराळयानांसाठी आपत्कालीन परिस्थितींमध्ये जीवनरक्षक म्हणून भूमिका बजावण्याची क्षमता या अंतराळयानात असल्याचे या घटनेमुळे सिद्ध झाले आहे.

दरम्यान, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे पृथ्वीवरील नियोजित अवतरण तांत्रिक अडचणींमुळे आधीच लांबणीवर गेले आहे. आठ दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळात गेलेले हे अंतराळवीर आता तीन आठवड्यांहून अधिक काळ अंतराळात आहेत. स्टारलाइनर या अंतराळयानात आढळून आलेल्या हेलियम गळती आणि इंजिनच्या समस्यांवर नासा आणि बोइंग काम करत आहेत.

ही आव्हाने असूनही, सुनीता आणि बुच यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्याची क्षमता स्टारलाइनरमध्ये आहे असे नासाने स्पष्ट केले आहे. अंतराळातील मोहिमांमध्ये वाढ होत असताना अवकाशातील कचऱ्याचे व्यवस्थापन हे जगभरातील अंतराळ संस्थांसाठी चिंतेचा विषय बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT