Saudi Robot Viral Video eSakal
विज्ञान-तंत्र

Saudi Robot : सौदीमधील रोबोटने केलं महिला पत्रकाराशी गैरवर्तन? सोशल मीडियावर पडले दोन गट.. पाहा व्हायरल व्हिडिओ

Viral Video : सौदी अरेबियाच्या या पहिल्या ह्यूमॅनॉईड रोबोटचं नाव अँड्रॉईड मुहम्मद असं आहे. या रोबोटची मुलाखत घेण्यासाठी राव्या अल-कासिमी या महिला रिपोर्टर उपस्थित होत्या.

Sudesh

Saudi Humanoid Robot Viral Video : सौदी अरेबियाने आपला पहिला ह्यूमॅनॉईड रोबोट तयार केला आहे. या रोबोटला पाहण्यासाठी जगभरातून लोक गर्दी करत आहेत. मात्र, हा रोबोट सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. एका महिला रिपोर्टरला मुलाखत देताना, तिला आक्षेपार्ह पद्धतीने हात लावल्याचा आरोप या रोबोटवर केला जात आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अँड्रॉईड मुहम्मद

सौदी अरेबियाच्या या पहिल्या ह्यूमॅनॉईड रोबोटचं नाव अँड्रॉईड मुहम्मद असं आहे. या रोबोटची मुलाखत घेण्यासाठी राव्या अल-कासिमी या महिला रिपोर्टर उपस्थित होत्या. यावेळी अँड्रॉईड मुहम्मदने त्यांना मागच्या बाजूने हात लावला. यामुळे राव्या अनकम्फर्टेबल झाल्या. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला, आणि रोबोटच्या या गैरवर्तनाचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला.

सोशल मीडियावर दोन गट

दरम्यान, या व्हिडिओवरुन सोशल मीडियावर प्रतिक्रियांचे दोन गट पहायला मिळत आहेत. या रोबोटने केलेला हा प्रकार गंभीर आणि चुकीचा असल्याचं काहींचं म्हणणं आहे. तर, रोबोटची हालचाल अगदी नैसर्गिक होती. ती रिपोर्टर त्या वेळी त्या ठिकाणी उभी असणं हा केवळ योगायोग असल्याचं काहींचं म्हणणं आहे.

रोबोट्सच्या वागणुकीमुळे चिंता

ह्यूमॅनॉईड रोबोट्स वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जगातील सर्वात एडव्हान्स ह्यूमॅनॉईड रोबोट Ameca ने देखील काही प्रश्नांवर चिंताजनक उत्तरे दिली होती. "तुझ्या आयुष्यातील सर्वात दुःखद दिवस कोणता होता?" या प्रश्नावर तिने "ज्या दिवशी मला समजलं की मला कधीच मानवांप्रमाणे खरं प्रेम किंवा साथीदार मिळू शकणार नाही, तो माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखद दिवस होता" असं म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT