SBI Bank SBI Bank
विज्ञान-तंत्र

SBI ग्राहकांना करावा लागणार समस्येचा सामना; ही राहील वेळ

सकाळ डिजिटल टीम

एसबीआयचे (SBI) ग्राहक असाल तर तुम्हाला काही तासांसाठी समस्येचा सामना करावा लागू शकतो. कारण, एसबीआय तंत्रज्ञान अपग्रेड करीत आहे. यामुळे Yono ते UPI या सेवांना रात्री २३.३० ते २ वाजेपर्यंत अडचण जाईल. या कालावधीत एसबीआयच्या बहुतांश सेवा बंद राहतील.

एसबीआयच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार, YONO, YONO Lite, YONO Business आणि UPI च्या सेवा या कालावधीत निलंबित बंद राहतील. तंत्रज्ञान अपग्रेड कालावधी दरम्यान यापैकी कोणतीही सेवा वापरल्यास समस्या उद्भवू शकते. ग्राहकांना चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने बँका वेळोवेळी देखभालीचे काम करतात. सहसा हे काम रात्री उशिरा केले जाते. जेणेकरून किमान वापरकर्त्यांना त्रास होतो.

एसबीआयबद्दल (SBI) बोलायचे झाले तर २२ जानेवारी २०२२ रोजी देखील काही डिजिटल सेवा पहाटे दोन ते ८.३० पर्यंत ठप्प होत्या. यामध्ये इंटरनेट बँकिंग, YONO, YONO Lite, YONO Business आणि UPI सेवांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Leaders Join Congress : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! १०० हून अधिक नेते-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला; यावेळी भाजप नाही तर कॉंग्रेसमध्ये प्रवेश

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

आरोग्य‘चेतना’ : स्पायनल ट्युमरची अत्याधुनिक शस्त्रक्रिया

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

SCROLL FOR NEXT