L E D Tv
L E D Tv Sakal
विज्ञान-तंत्र

Sci-tech : सर्वात स्वस्त QLED

सकाळ वृत्तसेवा

Sci-tech : घरांतील एलईडी टीव्हीच्या पुढच्या पिढीचा जमाना आहे. बाजारात ‘क्यूएलईडी’ (Quantum dot Light Emitting Diode) टीव्ही उपलब्ध आहेत. मात्र, किमतीच्या बाबतीत ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. हे टीव्ही महाग असण्यामागचे कारण म्हणजे त्यांची पिक्चर क्वालिटी की, जे एलईडी टीव्हीपेक्षा खूपच दर्जेदार असतात. किमतीचा विचार करून सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे क्यूएलईडी टीव्ही इनफिनिक्स कंपनीने भारतात उतरविले आहेत. कंपनीकडून तिचे दोन नवीन स्वस्त ‘क्यूएलईडी’ ४ के टीव्ही लॉन्च केले गेले आहेत. नवीन मॉडेल हे ५० इंच आणि ५५ इंचाचे आहेत. ‘इनफिनिक्स झिरो ५०’ (Infinix ZERO 50) आणि ‘इनफिनिक्स झिरो ५५’(Infinix ZERO 55) अशी दोन मॉडेल्सची नावे आहेत.

काय आहे या टीव्हींमध्ये : ‘इनफिनिक्स झिरो ५०’ हे मॉडेल अनेक फिचर्सनी सुसज्ज आहे. यामध्ये ‘४ के’ रिझोल्यूशनसह ३०० नीट्स पीक ब्राइटनेस, १२२ टक्के एसआरजीबी कलर गॅमेट आणि एचडीआर १० सपोर्ट मिळतो. दमदार आवाजासाठी, यात डॉल्बी ऑडिओसह ड्युअल २४ डब्ल्यू बॉक्स स्पीकर आहेत. कार्यक्षमतेसाठी, यामध्ये मीडिया टेक क्वाड कोर प्रोसेसर आहे की, ज्यामध्ये १.५ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज दिला आहे आणि कनेक्टिव्हिटीसाठी, यामध्ये ३ एचडीएमआय पोर्ट, २ युएसबी पोर्ट आणि ड्युअल बँड वाय-फायदेखील आहे.

तर क्वांटम डॉट तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या ५५-इंच मॉडेलमध्ये क्यूएलईडी स्क्रीन मिळेल. सोबतच ‘४ के’ रिझोल्यूशन, एचडीआर १० प्लस आणि ४०० नीटस्‌ पीक ब्राइटनेससाठी सपोर्टही मिळतो. दमदार आवाजासाठी, यात ड्युअल ३६ डब्ल्यू बॉक्स स्पीकर आहेत की, जे डॉल्बी डिजिटल ऑडिओ आणि २ ट्विटरसह येतात. यात मीडियाटेक क्वाड कोर सीए ५५ प्रोसेसर आहे की, जो २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेजसह मिळतो. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, या स्मार्ट टीव्हीमध्ये ३ एचडीएमआय, २ यूएसबी पोर्ट, ब्लू टुथ ५, वायफाय आहे. याशिवाय एन एव्ही (n AV) इनपुट, लॅन (LAN) तसेच हेडफोन पोर्टचाही पर्याय आहे. किमतीचा विचार केल्यास ‘इनफिनिक्स झिरो ५०’ची किंमत २४ हजार ९९० रुपये तर ‘इनफिनिक्स झिरो ५५’ची किंमत ३४ हजार ९९० रुपये निश्चित केली आहे. हे टीव्ही ई-कॉमर्स साईटस्‌वर उपल्बध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT