Scientific Study Reveals Earth's Inner Core is Slowing its Rotation esakal
विज्ञान-तंत्र

Earth's Core Slowing Down : पृथ्वीच्या गाभ्याचं फिरणं झालंय कमी;दिवसाच्या लांबीवर परिणाम?संशोधनातून समोर आलेलं रहस्य जाणून घ्या

Space Study : पूर्ण जगाला चिंता वाटेल अशी माहिती संशोधनातून आली समोर,२०१० फिरण्याची गती आलीये कमी

Saisimran Ghashi

Earth : आपल्या पृथ्वीच्या अंतराळात घडणाऱ्या घटना अजूनही पूर्णपणे उलगडलेल्या नाहीत. अश्यातच एक नवा शोध समोर आला आहे. या शोधाचा पृथ्वीच्या दिवसाच्या लांबीवर परिणाम होऊ शकतो.

अमेरिकेच्या दक्षिणी कॅलिफोर्निया विद्यापीठातील जॉन विडेल यांनी केलेल्या संशोधनानुसार पृथ्वीच्या आतील असलेल्या लोखंड आणि निकेलचा बनलेला घन, गोलाकार गाभा 2010 पासून त्याच्या फिरण्याची गती कमी करत आहे. याचा अर्थ असा होतो की पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तुलनेने गाभा हळूहळू फिरणं कमी करतोय.

पृथ्वीच्या तीन थरांपैकी हा गाभा एक आहे. बाह्य थरात तरल धातू असतो तर अंतर्गत थरा हा घन असतो. संशोधक भूकंपांच्या लाटांचा अभ्यास करून या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे. ही लाट जमिनीच्या अंतर्गत हालचालीची माहिती देतात.

1970च्या दशकांपासून अंतर्गत गाभा पृथ्वीच्या पृष्ठभागापेक्षा वेगळ्या गतीने फिरत असल्याचे संशोधकांना आढळले होते. पण 2010 पासून मात्र त्याची फिरण्याची गती कमी होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी असेही संशोधन झाले होते की पृथ्वीच्या बाह्य गाभ्यातील द्रवाची फिरण्याची गती कमी होत आहे. त्यामुळे पृथ्वीचा घन भाग वेगवान फिरत आहे. यामुळे गेल्या काही दशकांत 'लीप सेकंद' (अतिरिक्त सेकंद) जोडण्याची गरज कमी झाली आहे. दर काही वर्षांनी असा अतिरिक्त सेकंद जोडला जातो कारण पृथ्वी नेहमी एकाच गतीने फिरत नाही.

नवीन संशोधनासाठी, संशोधकांनी 1991 ते 2023 दरम्यान दक्षिण अटलांटिक महासागरातील दक्षिण सँडविच द्वीपसमूहात झालेल्या 121 भूकंपांचा अभ्यास केला. या बेटांवर सतत भूकंप येत असतात. त्याचबरोबर 1970च्या दशकातील रशियन अणुबॉम्ब परीक्षणाचा आणि इतर अभ्यासांद्वारे मिळालेल्या माहितीचाही या संशोधनात समावेश करण्यात आला.

हे संशोधन पृथ्वीच्या अंतर्गत घडणाऱ्या हालचाली समजण्यासाठी आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी खूप महत्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Dombivli Election : आमदारांच्या मुलाचा बिनविरोध विजय; कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाची घोडदौड वेगात!

Sudhakar Badgujar : नाशिक भाजपमध्ये बडगुजर पॅटर्नचा धमाका; पत्नी आणि पुत्रासह स्वतःची उमेदवारी केली निश्चित

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

BEE Star Rating : इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदीचे नियम बदलले; लागू झाला BEE स्टार रेटिंगचा आदेश, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

Khus Khus Halwa: गाजर किंवा मूगडाळीचा हलवा विसरा! या हिवाळ्यात ट्राय करा पौष्टिक आणि चविष्ट ‘खसखस हलवा’

SCROLL FOR NEXT