Seatbelt In Auto Rickshaws esakal
विज्ञान-तंत्र

Seatbelt In Auto Rickshaws : आता रिक्षातही लावावा लगणारा सीटबेल्ट

ऑटोमध्ये सीट बेल्ट हे ऐकणे जरा विचित्र वाटत आहे

सकाळ डिजिटल टीम

Seatbelt In Auto Rickshaws : ऑटोमध्ये सीट बेल्ट हे ऐकणे जरा विचित्र वाटत आहे. परंतु, आता लवकरच हे शक्य होणार आहे. हो हे खरं आहे. रॅपिडो आपल्या ऑटो मध्ये सीटबेल्टची सुविधा उपलब्ध करीत आहे.

प्रवाशांना रोजचा प्रवास जास्त सुरक्षित व्हावा यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यासोबत रस्ते सुरक्षा संबंधी लोकांमध्ये अलर्ट निर्माण व्हावा, यासाठी हे काम केले जात आहे. ही मोहीम बेंगळुरूपासून सुरू केली आहे. ती हळूहळू संपूर्ण देशात सुरू केली जाणार आहे.

प्रवाशांची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून कंपनीने आपल्या ड्रायव्हर कॅप्टनची चार स्टेप मध्ये बॅकग्राउंड व्हेरिफिकेशन प्रोसेस सुद्धा सुरू केली आहे. याअंतर्गत कंपनी प्रवास दरम्यान प्रवाशाला सर्व प्रकारची सुरक्षा देण्यासाठी कटीबद्ध आहे. तर महिला प्रवाशासाठी कंपनी माहिती लपवणारे फीचर घेऊन आली आहे. कारण, त्यांची खासगी ओळख सुरक्षित ठेवता येऊ शकते. हे अॅप लाइव्ह राइड ट्रॅकिंग व २४ तास ग्राउंड सपोर्ट देते. शेयर्ड राइडमध्ये संपूर्णपणे सुरक्षा मिळू शकते.

याशिवाय, कंपनीने आपल्या कॅप्टन व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अॅप मध्ये अनेक सेफ्टी फीचर्स जोडले आहेत. यात रायडर्ससाठी सेफ्टी ट्रेनिंग, रेग्युलर वाहन मेंटनेंस चेक व रियल टाइम राइडची ट्रॅकिंगचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की, सर्व रॅपिडोसाठी हे बंधनकारक करण्यात आले आहे.

ते लर्निंग मोड्युल सिस्टम व कस्टमर सोबत योग्य व्यवहार करण्याचे प्रशिक्षण, रोड सेफ्टी ट्रेनिंग, आणि ऑपरेशनल ट्रेनिंगला पूर्ण करणे. रॅपिडोने याआधी देशभरातील ट्रॅफिक पोलिसासोबत पार्टनरशीप करून जनजागृती मोहीम सुरू केली होती. भारतात रस्ते वाहतूक दूर्घटना सर्वात जास्त होतात. त्या कमी करण्यासाठी रॅपिडो प्रयत्न करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : उद्या ठाकरेंचा विजयी मेळावा- वरळी डोममध्ये तयारी सुरु

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT