Car Buying Tips 
विज्ञान-तंत्र

सेकंड हँड कार खरेदी करताना या टिप्स लक्षात ठेवा, फायद्यात राहाल

सकाळ डिजिटल टीम

second hand car buying tips : जर तुम्ही वापरलेली कार घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. कोणतीही वापरलेली कार खरेदी करण्यापूर्वी ती नीट तपासली पाहिजे. बहुतांश ऑटोमोबाईल कंपन्यांनी सेकंड हँड कारसाठी स्वतःचे शोरूम उघडले आहेत. जर तुम्ही दुसरी कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ती कुठूनही घेऊ शकता. पण खरेदी करताना काही गोष्टी आवर्जुन लक्षात ठेवल्या पाहिजेत, कारण कार तपासण्यासाठी फक्त टेस्ट ड्राइव्ह पुरेसे नसते. चला तर मग अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या तुम्ही वापरलेल्या कार खरेदी करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत.

कारचा आवाज

वाहन सुरू करा आणि ते न्यूट्रल गिअरवर सोडा आणि आत बसताना केबिनमध्ये येणार्‍या आवाज आणि व्हायब्रेशनकडे लक्ष द्या. यानंतर, एक्सेलेटर कमी करा आणि कमी करताना खिडकी उघडून आणि बंद करून येणारा आवाज ऐका. तुम्हाला कोणताही अतिरिक्त आवाज किंवा व्हायब्रेशन वाटत असल्यास, कार डीलरशी बोला. कार खरेदी करताना टेस्ट ड्राईव्हचा प्रश्न येतो तेव्हा घाईघाईत कमी अंतराचा टेस्ट ड्राइव्ह घेऊ नका. किमान 30 किलोमीटरची टेस्ट ड्राइव्ह घ्या. याद्वारे तुम्हाला वाहनाची नेमकी स्थिती जाणून घेता येणार आहे.

कारचा धूर तपासा

वापरलेली कार खरेदी करताना, आपण सर्वप्रथम लक्ष दिले पाहिजे ती म्हणजे तिच्या फिटनेस कडे. त्यासाठी वाहनाच्या सायलेन्सरमधून निघणाऱ्या धुराच्या रंगाकडे लक्ष द्या. जर धुराचा रंग निळा किंवा काळा असेल तर ते इंजिनमधील बिघाडामुळे असू शकते. याशिवाय इंजिनमध्ये ऑइल लीकेजची समस्या देखील असू शकते. टेस्ट ड्राइव्ह दरम्यान, जळत्या तेलाचा किंवा तारांचा वास येत नाहीना याची खात्री करा. किवा थेट इंजिन तपासण्यासाठी चांगल्या मेकॅनिकला भेटा.

फायनांस पॉलिसी

कोणतीही वापरलेली कार खरेदी करण्यापूर्वी, त्याची कागदपत्रे तपासणे खूप महत्वाचे आहे. कारचे इंश्योरंस व्हॅल्यु देखील पाहा, हे आपल्याला कारच्या किंमतीत वाटाघाटी करण्यास मदत करेल. तसेच मागील 2-3 वर्षातील नो क्लेम बोनसचा ट्रॅक करा. यामुळे अपघात किंवा इतर कोणत्याही कारणामुळे वाहनाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी किती खर्च येतो याची माहिती मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT