The-secret-of-the-most-ener.jpg 
विज्ञान-तंत्र

सर्वाधिक ऊर्जावान कणांचे रहस्य उलगडले; पुण्यातील संशोधकांना यश 

सम्राट कदम

पुणे : पृथ्वीवरील तसेच ब्रम्हांडात आढळणाऱ्या सर्वोच्च 'ऊर्जा' असलेल्या कणांचे रहस्य उलगडण्यास पुण्यातील संशोधकांना यश मिळाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 'भौतिकशास्त्र विभागा'तील डॉ. सुरजित पॉल यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांच्या समूहाने ही कामगिरी बजावली. आंतरविद्यापीठीय खगोलभौतिकी आणि खगोलशास्त्र केंद्र (आयुका) आणि जर्मनीतील वैज्ञानिकांच्या सहयोगातून हे संशोधन करण्यात आले. लंडनच्या 'रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी'च्या शोधपत्रिकेत नुकता हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.&

ब्रम्हांडात दोन महाकाय 'आकाशगंगा समूह' (क्‍लस्टर्स) एकत्र आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचे उत्सर्जन होते. हीच ऊर्जा 'कॉस्मिक रे' म्हणून ओळखली जाते. आजपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया कशी पार पडते, तिची निरीक्षणे कशी घेता येतील याबद्दल जगातील शास्त्रज्ञ अनभिज्ञ होते. परंतु डॉ. पॉल यांच्या संशोधनाने हे सर्व प्रश्‍न निकालात काढले आहे.

शोधाबद्दल सांगताना डॉ. पॉल म्हणाले, ''दोन क्‍लस्टर्सच्या संयोगातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जा प्रक्रियांचा अभ्यास करणे उपलब्ध संसाधनांनी शक्‍य नसल्याचे शास्त्रज्ञांचे मत होते. परंतु संगणकीय गणिती प्रक्रियेने हे रहस्य उलगडण्यास आम्हाला यश आले आहे. या शोधामुळे क्‍लस्टर मधून बाहेर पडणाऱ्या ऊर्जा किरणांतील बदलांचा आणि पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्वोच्च उर्जावान कणांचा अभ्यास करण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया निर्माण करायला शास्त्रज्ञांना मार्गदर्शन मिळणार आहे.'' 

या संशोधनामुळे पृथ्वीवर येणाऱ्या कॉस्मिक रेज अर्थात सवोच्च उर्जावाण कणांचा अभ्यास करणे शक्‍य होणार आहे. तसेच ब्रम्हांडातील सर्वाधिक शक्तिशाली ऊर्जा प्रवेगकाचे रहस्य शास्त्रज्ञांसमोर आले आहे. डॉ. पॉल यांचे संशोधक विद्यार्थी डॉ. रिजू सॅमजॉन, जर्मनीतील डॉ. ल्युईजू यापीचिनी, डॉ. कार्ल मॅनहाईन आणि आयुकातील अत्याधुनिक संगणक प्रणालीचा या संशोधनात सहभाग आहे. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT